Amalner

Amalner: प्रभाग क्रमांक एक मध्ये घरोघरी फडकला तिरंगा..नगरसेवक नरेंद्र चौधरींनी 800 तिरंगा ध्वज केले वाटप..

Amalner: प्रभाग क्रमांक एक मध्ये घरोघरी फडकला तिरंगा..नगरसेवक नरेंद्र चौधरींनी 800 तिरंगा ध्वज केले वाटप..

अमळनेर-शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात घरोघरी तब्बल 800 तिरंगा राष्ट्रध्वज वाटप केले असून या प्रभागात प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येक धर्मीय सहभागी झाल्याचे चित्र प्रभागात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर तिरंगा हे अभियान आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी मा.नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आधीच उत्कृष्ठ नियोजन करीत बाहेरगावाहून एक हजार राष्ट्रध्वज उपलब्ध केले होते, दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी हे ध्वज लावायचे असल्याने त्याआधीच आपल्या स्वयंसेवकामार्फत प्रत्येक नागरिकास घरपोच हे ध्वज पाठविण्यात आले व सोबत या ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या,या प्रभागात बंगाली फाईल,टाकी फाईल,केशव नगर,रामवाडी, आययुडीपी कॉलनी, ख्वाजा नगर यासह सर्व कॉलनी परिसरात हे ध्वज वेळेत पोहोचविले गेल्याने दि 13 पासून प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरी तिरंगा फडकला आहे.
दरम्यान जनहीताचे अनेक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण करणारे नरेंद्र चौधरी देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात देखील अव्वल ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर आपण देशाचा अभिमान म्हणून राष्ट्रध्वज नागरिकांपर्यंत पोहोचवले असले तरी आमच्या प्रभागातील नागरिकानी आमच्याकडून किंवा इतर ठिकाणाहून राष्ट्रध्वज उपलब्ध करून काळजीने आपल्या घरी फडकविल्याने याचा जास्त अभिमान आपल्याला असल्याची भावना नरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button