Mumbai

26 जाने. गणराज्य दिनापासून होणार शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन…

26 जाने गणराज्य दिनापासून होणार शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन…वॉटर बेल पुन्हा वाजणारराज्य शासनाचा आदेश आदेश…याबरोबर होणार अनेक प्रलंबित विषयांची सुरुवात

प्रा जयश्री साळुंके

मुंबई | महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.गणराज्य दिन 26 जानेवारी पासून सर्व शाळांम परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेणे आवश्यक आहे. अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परिपाठतील अतिरिक्त आणि अनावश्यक विषय घेतले जाणार नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच संविधानाची तत्वे रुजवण्याचा ह्या आदेशा मागे आहे.

26 जाने. गणराज्य दिनापासून होणार शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन...

राज्यातील शेकडो प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ शाळेच्या इच्छेनुसार घेतला जातो.आता 26 जानेवारीपासून शाळेच्या परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे. संविधानातील स्वातंत्र, समता आणि बंधुता या मुल्यांची रुजवण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, 2013 सालीच शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 2014 साली भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ठाकरे सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • वॉटर बेल पुन्हा वाजणार
  • 26 जाने. गणराज्य दिनापासून होणार शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन...

याशिवाय प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्या साठी वॉटर बेल वाजविण्याचे देखील आदेश काढण्यात आले होते. परंतु कोणत्याही शाळांनी हा आदेशाची अंमलबजावणी केली नाही.आता पुन्हा हा आदेश जारी करण्यात आला असून दिवसभरात ठराविक वेळेला योग्य पाणी पिण्यासाठी ही वॉटर बेल वाजविली जाईल.26 जाने. गणराज्य दिनापासून होणार शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन...विद्यार्थ्यांनि योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. अनेक वेळा मुले हे शालेय घडामोडींमध्ये व्यस्त असल्याने पाणी पीत नाहीत त्यामुळे त्यांना आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजवली जाणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button