Maharashtra

?मेधा पाटकर सुपारीबाज आंदोलक..भाजप आमदार भातळकरांची जीभ घसरली..

?मेधा पाटकर सुपारीबाज आंदोलक..भाजप आमदार भातळकरांची जीभ घसरली..

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली. मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांवर आता चर्चा नको तर हे काळे कायदे थेट रद्द करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

या आंदोलनाला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवला.
त्यासाठी, काहींनी दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल,” अशी मागणी केली आहे. मेधा पाटकर यांच्या याच भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळखर यांनी ट्विट करत संतापजनक वक्तव्य केलं आहे.
‘ही दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवले आहे, ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी’. असे संतापजनक वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button