India

आरोग्या चा मुलमंत्र…उचकी लागणे करणे व उपाय

आरोग्या चा मुलमंत्र…उचकी लागणे करणे व उपाय

उचकी का लागते आणि वरील परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते आणि उचकी येण्यामागे ठराविक असं कारण नाही. पण काही सामान्य कारण खालीलप्रमाणे आहेत –

* गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने
* खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने
* मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ‌ड्रिंक्स प्यायल्याने
* धुम्रपान केल्यामुळे
* तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते
* हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते

उपाय :

टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.

चॉकलेट पावडर : जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.

मीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते.

काळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल

साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.

लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.

डॉ किशोर बालासाहेब झुटे
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button