Amalner

अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विलासराव पाटील

अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विलासराव पाटील

अमळनेर अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तांची त्रैवार्षिक बैठक मानद अध्यक्ष अँड. संभाजीराव पगारे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच नाशिक येथे पार पडली. या बैठकीत नविन राष्ट्रीय अध्यक्षांची व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात आली. यात धुळे येथील माळी महासंघाचे कट्टर कार्यकर्ते विलासराव पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच प्रदेशअध्यक्षपदी यवतमाळ येथील अँड. राजेंद्र महाडोळे यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय माळी महासंघ ही माळी समाजाची भारतभर काम करणारी अराजकीय नोंदणीकृत संघटना आहे. दर तिन वर्षांनी या संघटनेची नविन कार्यकारिणी निवडण्यात येते. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मा. डी.के. माळी, ठाणे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांचे जागी नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खान्देशचे सुपूत्र धुळे येथील माळी समाजाचे ३५ वर्षांपासून महासंघाचे कार्यकर्ते असलेले विलासराव
पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीस संस्थापक नऊ विश्वस्तांनी पाठींबा दिला व बिनविरोध निवड केली. यासाठी संस्थापक विश्वस्त अँड. संभाजी पगारे, डी.के. माळी, राजाभाऊ काठे, एस.एन. महाजन, सौ. तारकाताई विवरेकर, राजाभाऊ रायकर, प्रा. कैलास लगड, प्रा. रामचंद्र झगडे, विलासराव पाटील यांनी एकमुखी पाठींबा दिला. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी यवतमाळ येथील अँड. राजेंद्र
महाडोळे यांची निवड करण्यात आली. लवकरच महाराष्ट्रासह इतर राज्यातील पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्षांद्वारे निवडली जाणार असून केंद्रीय कार्यकारिणी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. विलासराव पाटील यांनी १९८५ साली देवगाव देवळी, ता. अमळनेरचे समाज ग्रामशाखा अध्यक्ष पासून सुरुवात केली. त्यानंतर ते अमळनेर तालुकाध्यक्ष, धुळे जिल्हा सरचिटणीस, १९९८ साली धुळे जिल्हाध्यक्ष, नाशिक विभाग अध्यक्ष, २००१ साली त्यांनी अखिल भारतीय माळी महासंघ स्थापण्यात पुढाकार घेतला व ते घटना समितीचे सचिव होते. तसेच ते संस्थापक विश्वस्त आहेत. माळी कर्मचारी सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ता, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशा चढत्या क्रमाने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे
सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button