Amalner

अमळनेर येथील गांजा मागील गंजलेलं खाऊगिरी कारण..!पो नि जयपाल हिरे यांची कामगिरी उत्कृष्टच पण…हे आहेत “अंधारातील” काही विषय

अमळनेर येथील गांजा मागील गंजलेलं खाऊगिरी कारण..!पो नि जयपाल हिरे यांची कामगिरी उत्कृष्टच पण…हे आहेत “अंधारातील” काही विषय

काल अमळनेर पोलिसांनी गांजा पकडून चांगली कामगिरी केली.नवीन पो नि जयपाल हिरे यांच्या कार्याचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे आणि ते योग्य देखील आहे.कमी वेळात गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर चांगलाच वचक पो नि हिरे यांनी निर्माण केला आहे. काल जी गांजाची कार्यवाही झाली त्यात काही गोष्टींची जोरदार चर्चा गावात सुरू आहे.ह्या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची दिशाभूल करून त्यांच्या पर्यंत खरा प्रकार नेण्यात आलेला नाही. सरांची यात काही चूक नाही ते नवीन आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी अजून सांगण्यात आल्या नाहीत किंवा अजून काही गोष्टी समजण्यास वेळ लागेल.त्यांना ह्या गोष्टींची जाणीव देखील नसावी पण खबरी मागची खबर ठेवणारे अनेक जण आहेत.

पण खालील प्रमाणे विषय आहेत की ज्याची चर्चा गावात जोरदार पणे सुरू आहे

हा गांजा मागविण्यात आला होता त्या व्यक्तीचा उल्लेख नाही ती व्यक्ती सापडली नाही.कोणीतरी वस्तू मागवली म्हणून ती आली आहे. पण खात्रीशीर खबरीने दिलेल्या माहितीनुसार हा गांजा ज्या व्यक्ती ने मागविला होता तो देखील रात्री रेड च्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. पण आरोपींमध्ये त्याच नाव नाही.सदर व्यक्ती मार्केट भागात देखील गांजा व दारू इतर नशेचे पदार्थ विकतो.ह्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

जर गांजा प्रकरणात आज रोजी जे एरंडोलचे तिन्ही आरोपीच्या मोबाईल सी.डि.आर. मध्ये संबंधित व्यक्तीचे मोबाईल नंबर त्यात सापडतील.
एका पोलीस वाल्याच्या गल्ली तील संबंधीत राहत असल्याने त्याला पैसे घेऊन त्याला सोडून दिले अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

तिन्ही आरोपींची सखोल चौकशी केल्यास हा माल कुणी मागवला याची माहिती मिळू शकते. एक मोटरसायकल व एक चारचाकी वाहन यात फक्त तीन आरोपी हा देखील संशोधनाचा विषय आहे.

अमळनेर च्या बाहेरील व्यक्तीची टीप पोलिसांना मिळते पण अमळनेर मध्ये दारू व गांजा विकतो त्याची माहिती पोलिसांना नाही हा देखील चर्चेचा विषय आहे.

ह्याच व्यक्तीने मे ते जून महिन्यात जवळपास २०० किलो गांजा हा पोलीस कर्मचारी सोबत भागीदारी करून एक किलो १२ हजार रुपये प्रमाणे विकून जवळपास वीस लाख रुपये कामविल्याची चर्चा देखील आहे. हा एकच भागीदार नसून (पोलीस विभाग सोडून) इतर अनेक भागीदार असल्याची देखील चर्चा आहे.तरी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी जनसामान्य लोकांतून चर्चा होत आहे.खबरी मागची खबर ठेवणारे अनेक लोक आहेत.की जे कधीच फ्रंट वर येत नाहीत. याची जाणीव मांजराला जरूर असली पाहिजे कारण मांजराला असे वाटते की आपण डोळे मिटून दूध पित आहोत आपल्याला कोणी पाहणार नाही पण मांजर काळाच्या ओघात हे विसरते की फक्त त्याचेच डोळे मिटलेले आहेत इतरांचे उघडे आहेत. अमळनेर तालुका अत्यन्त सेन्सिटिव्ह तालुका आहे इथे अनेक दिग्गजांनी राजकारणापासून ते गुन्हेगारी पर्यंत इतिहास घडविला आहे.हे देखील मांजराने लक्षात ठेवावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button