? अखेर कोरोना च्या वाढत्या आकड्याने मोहल्ला कमेटेची स्थापना
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर शहरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांचा बेशिस्त पणा यावर उपाय म्हणून प्रशासनाने काल मोहल्ला कमेटी ही संकल्पना सुरु केली.
कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी , लाॅकडाऊन नियमांचे तंतोतंत पालन व्हावे याकरिता अमळनेर- प्रशासनातर्फे मोहल्ला समितीची बैठक घेण्यात आली.
कोरोना पार्श्वभूमीवर अमळनेरातील कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ७जुलै ते १३जुलै पर्यंत कडक लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या टाळेबंदचे जनतेकडून पालन व्हावे जनतेने बंद ला प्रतिसाद द्यावा जनतेचा सहभाग वाढावा ह्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली.
प्रास्ताविक करताना अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले.त्यांनी जनतेने या बंद मध्ये उस्फुर्त पणे सहभाग घ्यावा,नियमांचे पालन करावे, प्रशासनाला मदत करावी,गरज असेल तर च घरा बाहेर निघावे अशी माहिती देत होमियोपॅथी गोळ्यांचे सेवन त्याचे नियम त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना होमियोपॅथी गोळ्या वाटप केल्या.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की,कोरोनाशी युध्द जर करायचं असेल तर आपल्या परिसरात आपण तंतोतंत नियमांचे पालन केले पाहिजे.
आपल्या वार्डात,प्रभागात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठीसाठी प्रभागील लोकप्रतिनिधी पदाधिकारी ,कार्यकर्ते ,नगरसेवक यांनी आपआपल्या प्रभागातील नागरिकांना समजावून समजावून सांगा.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील वातावरण हलकं फुलक करत उपस्थितांचे स्पष्ट भाषेत कान टोचले.कोरोना ला हरविण्यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या कार्य करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी मांडले.
आय एम हाॅल जी.एस.हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत
मोहल्ला समिती सदस्यांना मा. आमदार अनिल पाटील, मा. माजी आमदार साहेबरा पाटील, मा. तहसीलदार मिलिंद वाघ मा.मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड मा.पोलिस निरीक्षक साहेब यांनी या मिटींग मध्ये मोहल्ला समितीच्या सदस्यांना या बैठकीत मार्गदर्शन केले.
यावेळी अँड शकील काझी वकिल यांनी प्रशासनाला सुचना केल्या.
अमळनेरात कोरोनाने मृत पावलेल्या व सिमेवर शहीद जवानांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी मा. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, मा. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मा.मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, मा.पोलिस निरीक्षक अंबादास मोरे , प्रशासन अधिकारी संजय चौधरी, न पा चे विरोधी पक्षनेते प्रविण पाठक शकील काझी वकिल व विविध प्रभागातील नगरसेवक, प्रमुख प्रतिनिधी व मोहल्ला समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमळनेर गोपनिय शाखेचे पोलिस डाॅ.शरद पाटील यांनी मानले.






