sawada

सावदा येथे माता रमाई यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी!

सावदा येथे माता रमाई यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

रावेर तालुक्यातील सावदा येथे सालाबादप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात रमाई बैध्द विहार समिती व सेतू सुविधा केंद्र सावदा यांनी त्यागमुर्ती मता रमाई यांच्या १२५ वी जयंती निमित्त सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा या विषयावर दि.६ व ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती सह माता रमाई यांच्या तैलचित्रास विधी प्रमाणे माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,मुक्ताईनगर येथील सुप्रसिध्द पत्रकार मतीन शेख, युसूफ शाह,नगरसेवक फिरोज खान पठाण,शाम अकोले,नगरसेविका नंदाताई लोखंडे,माजी नगरसेवक फिरोज लेप्टी,निरज सोनवणे,भरत नेहते, इत्यादी मान्यवरांनी सामूहिकपणे पुष्पमाला अर्पण केली.

यानंतर त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जीवनावर आधारित व आजच्या असंख्य महिलांनी त्यातून बोध घ्यावा असे प्रेरणादायक मनोगत सह गीत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
तसेच”फाटक्या लुघड्यात नांदली रमाई”या गीतावर रोशनी तायडे, रितिका मेढे,सारीका व साक्षी तायडे यांनी आकर्षण नृत्य सादर केले.तसेच याच धर्तीवर इतर मुलींनी देखील विविध गीतांवर बहुजन विचारधारेला तेजवण्यासाठी एका पाठोपाठ लाहन लाहान मुलींनी अतिशय सुंदर व पारंपरिक वेशभूषेत नृत्यसादर केले.यादरम्यान माजी नगरसेवक फिरोज लेप्टी व शाम अकोले यांनी दोन मुलींना पाच पाचशे रुपयेचे बक्षीस दिले.यावेळी नगरसेविका सुभद्रा बाई बडगे,शिक्षिका कामीनी तायडे,चेष्टफूला बाई लोंखडे, शोभाबाई तायडे,पत्रकार दिलीप चांदेलकर व फरीद शेख,नाना संन्यास,निरज सोनवणे,टारझन तायडे,खुशाल निकम(झबा),युवराज लोखंडे,गणेश तायडे,भुषण लोंखडे सह मुली व महिला संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांत तायडे(जोजो)व आभारप्रदर्शन गणेश तायडे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button