Amalner: बनावट नंबर प्लेट सह चाकू, टाम्या दोरखंडसह वेगवान जाणाऱ्या दरोडेखोरांना घेतले ताब्यात..!गस्तीच्या स फौ ची उत्कृष्ट कामगिरी..!
अमळनेर (प्रतिनिधी) बनावट नंबरच्या कारमधून दरोड्याच्या उद्देशाने जाणाऱ्या चार जणांना गाडीसह व ड्रायव्हर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व मालेगाव येथील रहिवासी आसून त्यांच्याकडे असलेल्या कारसह सुऱ्या, चाकू, टॉमी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की स.फौ. बापु साळुंखे व चंद्रकांत पाटील रात्रीची गस्त घालत असताना अमळनेर ते चोपडा रस्त्यावर इंन्डीगोला एम.एच.19 AV 5362 ही दुचाकीची बनावट नंबरप्लेट लावून जात असताना चालकासह एकूण चार व्यक्ती बसलेले दिसले. संशय आल्याने स.फौ. बापु साळुंखे यांनी कार थांबवून चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने साहील शेख सुलेमान (वय २२ वर्षे, रा. मालेगाव, विजयनगर, गल्ली नं. १ कुसुंबा रोड) असे सांगितले. तर त्याच्यासोबत खालीद शहा मेहमुद शहा (वय २१, रा. रमजानपुरा, कुसुंबा रोड, मालेगाव), इसरार
खान जमशेर खान (वय २३, रा. निहालनगर, मालेगाव) फिरोज शेख मुसा (वय २४, रा. साहील नगर, मालेगाव) होते. त्यांना विचारपूस केल्यावर त्यांनी जळगाव जात आहोत असे सांगितले. पण ते चोपडा रस्त्याने जात असल्याने संशय बळावल्याने स.फौ. बापु साळुंखे यांनी कारची पाहणी केली. कारच्या पुढील बाजुस कोणतीही नंबर प्लेट लावलेली नव्हती पण मागील बाजुस एम.एच.19 AV 5362 ही नंबर प्लेट लावलेली होती. मोबाईलवरील वाहन अॅपवर क्रमांक टाकून खात्री केली असता ती दुचाकीची असल्याचे निदर्शनास आले. कारची तपासणी केली असता डिक्की उघडुन पाहता त्यात चाकाच्या खाली एम.एच. 15, BX 0475 हा नंबर असलेल्या चार नंबर प्लेट मिळून आल्या. तसेच हुक असलेली लोखंडाची टामी व दुसरी सरळ किंचीत वाकलेली लोखंडी टामी अशा सुमारे २ फुट
लांबीच्या टाम्या मिळून आल्या. तसेच कारच्या मागील शिटच्या खाली करड़ा रंगाच्या हातरुमालात गुंडाळलेला एक धारदार चाकू, एक सुती पांढऱ्या रंगाचा दोरखंड व वेगवेगळ्या आकाराच्या मोटार सायकल व कारच्या चाव्यांचे दोन जुड़गे असे मिळुन आले. हे साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. ही कारही चोरीची असल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






