Baramati

बारामती उद्यापासून पुन्हा सुरू

बारामती उद्यापासून पुन्हा सुरू

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – चौदा दिवसाच्या कर्फ्यु नंतर बारामतीशहर व तालुक्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरू होणार आहेत.सकाकी 9 ते 7 या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे 14 दिवसापासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.
बारामतीत 7 संप्टेंबरपासून 20 संप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा या उद्देशाने हा कर्फ्यु लागू करण्यात आला होता.आज या शेवटीच्या कर्फ्यु दिवशी व्यापारी व प्रशासन यांची बैठक पार पडली.या बैठकीत सकाळी 9 ते 7 या वेळेत या वेळेत सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,सभापती नीता बारवकर,मुख्यधिकारी किरणराज यादव,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांच्यासह व्यापारी महासंघाचे नरेंद्र गुजराती, सुशील सोमाणी,निखिल मुथा, प्रवीण आहुजा आदी या बैठकीला उपस्थित होते.

नियम व अटींच्या अधीन राहून बारामतीतील व्यवहार सुरू करावेत यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरच्या वापरासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत या बैठकीत आग्रही भूमिका मांडण्यात आली.
मागील दोन महिन्यात बारामतीत मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.त्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेऊनच आपले व्यवहार सुरू करावेत अशी ठाम भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button