Amalner

शिरूड येथे भरदिवसा चोरट्यांनी मारला डल्ला… भर दुपारी एक लाख वीस हजाराचा ऐवज लंपास…

शिरूड येथे भरदिवसा चोरट्यांनी मारला डल्ला…
भर दुपारी एक लाख वीस हजाराचा ऐवज लंपास…

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे भर दिवसा चोरट्यांनी घरात शिरून कपाटातून सुमारे एक लाख वीस हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. ६ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मनोहर भगवान पाटील (वय ५४) हे दि. ६ रोजी सकाळी अकरा वाजता घरास कुलूप लावून शेतात गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नळाचे पाणी येणार असल्याने घरी आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. तसेच घरात जावून पाहिले असता कपाटातील पत्नीचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यात ९० हजार रुपये किमतीचा ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपला हार, २१ हजार किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, ९ हजार किमतीची तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आदी वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने अमळनेर पोलिसात भा. द. वी. कलम ४५४, ३८० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एस आय नरसिंह वाघ हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button