टायर फुटल्याने एसटी बस पुलाखाली कोसळली
५ प्रवासी जखमी सुदैवाने जिवीतहानी टळली
मुबारक तडवी रावेर
Raver : रावेर जळगाव मार्गावर आज सकाळी यावल वरुन रावेर कडे जाणार्या बस अपघातात ४ते ५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले . त्यांच्यावर प्रार्थमिक उपचार करून दुसऱ्या बसने त्यांना रवाना करण्यात आले . रावेर आगाराची बस जळगावकडे निघाली होती सकाळी १० वाजेच्या सुमारास या धावत्या बसचे पुढचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा जाऊन ती एका नाल्यात जाऊन पलटी झाली . या अपघातात ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले . बसमध्ये चालक वाहक सह १६ प्रवासी हा होते अपघाताची माहिती मिळाल्यावर भाजपचे नेते पद्माकर महाजन यांनी काही सहकारी आणि रुग्णवाहिका सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली होती त्यांनी या जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांच्यावर प्रार्थमिक उपचार करण्यात आले . त्यानंतर दुसरी बस बोलावून आगरप्रमुखांनी या प्रवाशांना जळगावकडे रवाना केले






