Amalner: रणधुमाळी 2024: अमळनेर विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छानणीत चार अर्ज अवैध…
अमळनेर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या एकूण 17 अर्जांची छाननी पार पडली.काल झालेल्या या प्रक्रियेत एकूण 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या छाननीत 2 उमेदवारांनी ए बी फॉर्म दिले नाही,1 उमेदवाराने प्रास्तावक आणि 1 उमेदवाराने सक्षम प्राधिकरणा समोर प्रतिज्ञापत्र सादर केले नाही म्हणून एकूण 4 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
यात कैलास दयाराम पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा एबी फॉर्म सादर केला नाही त्यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. तसेच जयश्री अनिल पाटील यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा अर्ज ए बी फॉर्म नसल्याने अवैध ठरवण्यात आला आहे. मात्र अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पार्टी तर्फे अर्ज सादर करणाऱ्या प्रदीप किरण पाटील यांनी कलम ३३ प्रमाणे १० प्रस्तावक दिलेले नसल्याने व संगीता प्रमोद पाटील यांनी नमुना २६ प्रमाणे सक्षम प्राधिकारणासमोर शपथ प्रमाणपत्र केले नाही म्हणून अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
एकूण 17 उमेदवारांपैकी 4 अर्ज अवैध ठरल्याने आता रिंगणात एकूण 13 उमेदवार आहेत.यात डॉ अनिल नथु शिंदे-काँग्रेस , अनिल भाईदास पाटील-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे गट पार्टी , सचिन अशोक बाविस्कर-बहुजन समाज पार्टी, अपक्ष म्हणून मा आमदार शिरीष दादा चौधरी अनिल भाईदास पाटील , अमोल रमेश पाटील , अशोक लोटन पवार , छबिलाल लालचंद भिल , निंबा धुडकू पाटील ,प्रतिभा रवींद्र पाटील ,प्रथमेश शिरीष चौधरी , यशवंत उदयसिंग मालचे , रतन भानू भिल ,शिवाजी दौलत पाटील यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार योग्य अर्ज वैध ठरवले आहेत.






