India

? दिवे लावा दिवे..प्रधानमंत्रीजी देशात दिव्यांची गरज नाही…अन्नाची..गरिबांची चूल पेटविण्याची गरज आहे…

प्रधानमंत्रीजी देशात दिव्यांची गरज नाही… अन्नाची..गरिबांची चूल पेटविण्याची गरज आहे…

प्रा जयश्री दाभाडे

भारत

6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आहे .कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव साजरा करणे स्वतःच लागू केलेल्या संचारबंदी मुळे शक्य नाही…. काय करावे आपल्या भारत देशाचे प्रधानसेवक अत्यन्त हुशार आहेत.अंधश्रद्धा पसरवून भारतातील नागरिकांना शेकडो वर्षांपासून मूर्ख बनविणे या देशात खूप सोपे आहे. धर्म,जातीयता,वंशवाद इ गोष्टींना खत पाणी घालणे,लोकांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणे हे खेळ अवरीत पणे सुरू आहेत.

कोरोना हा जैविक विषाणू आहे.त्याची उपाययोजना ही शास्त्रीय चिकित्सा करून अभ्यास, संशोधन करून च होणार आहे. 144 संचारबंदी चे कलम लागू असतांना लोकांना टाळ्या वाजविण्यासाठी बाहेर काढणे हा देखील एक प्रकारचा गुन्हाच आहे.मग हा गुन्हा जमाव घडवून आणणे, लोकांना रस्त्यावर उतरवणे,हा देखील गुन्हाच आहे. भारतीय संविधानानुसार मग तो या देशाच्या प्रधान सेवकांना ही लागू आहे. दिल्ली पोलीस यावर कार्यवाही का करत नाही?

आतातर काय म्हणे उद्या दिवे लावा… इथे हातमजुरी करणाऱ्या लाखो लोकांना रोजगार नसल्याने त्यांच्या चुली मंदावल्या आहेत.रोज कमवायचे आणि रोज आपले पोट भरायचे अशी संपूर्ण देशात कोट्यवधी जनतेची अवस्था आहे.त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा अन्न, पैसे चा साठा नाही. काही बिचारे भटके विमुक्त जाती रोजच भटकंती करतात आणि उदरनिर्वाह करतात.त्यांना लॉक डाऊन मुळे एकाच ठिकाणी वास्तव्य करून उपाशीपोटी राहावे लागत आहे. प्रधानसेवक यांना याची जाणीव आहे किंवा नाही हे माहीत नाही परंतु स्वतःचे उद्देश पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस मात्र त्यांनी धरले आहे.हे मात्र खरे …

आता ही वेळ दिवे पेटविणे, अंधार करणे,आणि टाळ्या वाजविण्याची नाही.गोर गरीब जनतेच्या चुली पेटविण्याची वेळ आहे. मुलं बाळ नसलेल्या व्यक्तीला काय समजणार आई बापाची मुलांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी धावपळ .. पण या देशातील करोडो जनतेच्या पोटी मात्र मुले बाळे आहेत त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील दिवस रात्र मेहनत करतात.आता मात्र मुले बाळे उपाशीपोटी मरण्याची वेळ आली आहे आणि वेगळेच “दिवे”लावले जात आहेत.

परदेशातील कोणत्याही देशाने जे कोरोना विषाणू च्या प्रभावाखाली आहेत तेथे असे प्रयोग केले नाहीत. जसे परकीय देशांमध्ये प्रधान सेवक वारंवार जाऊन आले आहेत आणि खूप काही शिकुन आले आहेत आणि शिकवून आले आहेत .मग परदेशातील विज्ञान, तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन इ आणि आता कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावावर उपाययोजना का नाही जनते पर्यंत पोचविली जात नाही ?त्यांनी अंधश्रद्धा नक्कीच शिकले नाहीत हे तर सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे कारण त्यांनी ही टाळ्या,दिवे पेटविले असते. भारतात हातून सुटत चाललेली सत्ता कशी ताब्यात राहील याचा विचार केला जात आहे सामान्य जनतेचा नाही.

प्रधान सेवकजी याना भारताचा भौगोलिक अभ्यास नसल्याचे स्पष्ट होत आहे. भारतातील उष्ण कटी बंधीय प्रदेशात इतके ऊन आहे की या प्रांता मध्ये जमीन,वस्तू,प्रखर सूर्या मुळे इतक्या तापतात की मध्यरात्री पर्यंत त्याचा प्रभाव असतो.थंड वातावरणात पसरणाऱ्या कोरोना विषाणू चा सामना करण्यासाठी भारताचे उष्ण वातावरणच पुरेसे आहे. त्यामुळे आणखी दिवे लावू नयेत.चुली पेटवा गोरगरिबांच्या… आम्ही पेटवू चुली…आपण काय करणार?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button