रायपूर येथील महिलेचा विनयभंग करून वडिलांना दिली जिवे ठार मारण्याची धमकी
सावदा प्रतिनिधी/युसूफ शाह
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर या गावी महिलेचा विनयभंग करून त्या आरोपींनी फिर्यादी महिलेच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून ही घटना रायपूर या गावात घडलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सावदा शहरापासून साधारण 12 ते 16 कि.मी.अंतरावर रायपूर या गावांतील सुजाता सुनील बोदडे रा. सुरत व हल्ली मुक्काम रायपूर येथे रहिवास करीत असून गावातील संशयित आरोपी आकाश जिवन मोहासे व रोहन जिवन मोहासे यांनी फिर्यादी महिलेच्या अंगावर वरील कपडे फाडून तिच्या छातीवर, अंगावर,खाद्यावर,हाताने ओरखडून व फिर्यादीस मारहाण करून तिला लज्या येईल असे कृत्य करुन त्यांनी सदरील महीलेचा विनयभंग केला,व फिर्यादीचे वडील शालिक दयाराम तायडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर,नाकावर, काठीने व कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.तरी आम्ही दोघजण दोन दिवसात सुटुन आल्यानंतर तुम्हाला बंदुकीच्या गोळीने उडवून देवू.अशी धमकी सदरील आरोपींनी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशन गु.र.नं.११२/२०२३ रोजी भा.द.वी.कलम३०७,३२६,४४८,३५४(अ)३२३,५०४,५०६,४२७,३४प्रमाणे दाखल असून. मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी प्रताप शिकारे पो.स्टे.ए.पी.आय.जलीदंर पळे, पो.उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. अनवर तडवी ,पो.हे.का.संजय चौधरी हे तपास करीत आहे






