Dhule

मुकटी येथील अखंड हरिनाम किर्तनी सप्ताह कोरोनामुळे रद्द

मुकटी येथील अखंड हरिनाम किर्तनी सप्ताह कोरोनामुळे रद्द

राहुल साळुंके धुळे

धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी येथे प्रतिवर्षाप्रमाणे फाल्गुन शुद्ध षष्ठीला जिल्हास्तरीय अखंड हरिनाम किर्तनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाचे यंदा २८ वे वर्ष पूर्ण होत आहेत,परंतु धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने हा सप्ताह रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने व ग्रामस्थांनी घेतला आहे,या सप्ताहात अनेक नामवंत किर्तनकारांचे कीर्तने व श्री ज्ञानेश्वरी पारायन,हरिपाठ, पालखी सोहळा,व सातव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचे व महाप्रसादाने या सप्ताहाचा समारोप करण्यात येतो.या सात दिवशीय सप्ताहामुळे गावात धार्मिक चैतन्य निर्माण होते,
परंतु यंदाचा हा किर्तनी सप्ताहात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीर्तने,पारायण,रद्द करण्यात आले आहेत, यावर्षी फक्त श्रीराम मंदिरात गावच्या सरपंचाच्या हस्ते या सप्ताहाची मांडणी व महाआरती करण्यात आली.तसेच श्रीराम मंदिरात गावातील गुरुदत्त भजनी मंडळ सात दिवस नामस्मरण जप करतील, असे गावाचे सरपंच चतुर पाटील सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button