भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली
बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकण बाबत आवाज उठवणार
निवेदन द्वारे मांगणी
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा ता रावेर जि जळगाव येथीलअॅगलो उर्दू हायस्कूल या शाळेतुन विद्यार्थी हक्काचे जवळपास बारा ते पंधरा क्विंटल तांदूळ मार्च 2020च्या शेवटच्या आठवड्यात विक्री करण्यात आले. या बाबत वारंवार पुराव्यानिशी लेखी तक्रार खालील अधिकाय्रा पासून ते वर पर्यंत करण्यात आली. परंतु आजपर्यंत याची पुर्ण पणे दखल संबंधित शिक्षण विभागा कडुन घेण्यात आलेली दिसत नाही.
महणुन सदरील गंभीर प्रकरण दाबला जावू नये या साठी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शेख याकुब शेख नजीर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांना शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सदरील तांदूळ विक्री गैर प्रकरणाची अधिकृत माहिती असून ही शालेय पोषण आहार अधिक्षक रावेर यांनी तातडीने दखल न घेता चौकशी व कारवाई करण्यास थेट उघड पणे दिरंगाई केली. शाळा संबंधितांशी अर्थ पुर्ण संबंध मुळे या प्रकरणा कडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले.
त्यांची कुचकामी भुमिके बद्दल गटविकास अधिकारी श्रेणी 1 रावेर व सभापती जितेंद्र पाटील रावेर , मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जि प जळगांव कडे तक्रार करुन ही कारवाई मात्र होत नाही. संबंधित शिक्षण विभागा कडुन यां प्रकणाची सखोल चौकशी सुध्दा करण्यात आलेली नाही.
सबब हा गंभीर प्रकार दाबला जावू नये या प्रमुख मांगणी चे निवेदन भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली चे वरीष्ठ पदाधिकारी यांना दि.31/07/2020 रोजी देण्यात आले.
*गंगावणे यांची संबंधित अधिकाय्रांना चिथावणी*
पुढील आठवड्यात पं.स. रावेर व जिल्हा परिषद जळगांव येथे जावून संबंधित अधिकाय्रांशी भेट घेऊन सदरील प्रकरणा बाबत जाब विचारण्यात येईल व त्यांना लेखी निवेदन देवून त्वरीत सखोल चौकशी व कार्रवाई साठी भाग पाडु असे तक्रार दार यांना प्रदेश अध्यक्ष राहूल गंगावणे व प्रदेश संपर्क प्रमुख शेख याकुब शेख नजीर यांनी आशवासित केले आहे. व भ्रष्टाचार करणाय्रांचे पितळ उघडे पाडल्या शिवाय सवस्त बसणार नाही.






