Rawer

खिर्डी रेंभोटा शिवारात अजगराच कायम वास्तव्य.. ..उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

खिर्डी रेंभोटा शिवारात अजगराच कायम वास्तव्य.. ..उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी

प्रविण शेलोडे.
खिर्डी रेंभोटा शिवारात असलेल्या लोखंडी रेल्वे पुलाजवळून विवरा गावातील सांडपाणी आणि शेतशिवाराचे पाणी वाहण्यासाठी आधीपासून नाला असल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवेगार गवत झाले आहे.या ठिकाणी रेंभोटा व खिर्डी येथील पशुपालक आपली जनावरे चारन्याकरिता नेहमी येत असतात.परंतु काल दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या सुमारास खिर्डी येथील रहिवाशी राजू कोचुरे यांचे नातू दीपक तायडे हे आपल्या मित्रांसमवेत बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.बकऱ्या चरत असताना अचानक नाल्यातून दहा ते पंधरा फूट लांबीचा अजगर आला आणि कळपातील बकरी ला तीन चार वेटोळे मारल्यानंतर बकरी ला गिळले असे दीपक तायडे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना माहिती दिली.

खिर्डी रेंभोटा शिवारात अजगराच कायम वास्तव्य असल्याकारणाने मेंढपालाचे नुकसान होतेय आणी आमच्या जीवाचे काही बर वाईट झाले तर काय? तरी संबधित अधिकार्यांनी याची दखल घेऊन उपाययोजना करावी.
…….. दीपक तायडे,प्रत्यक्षदर्शी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button