Maharashtra

नाशिक जिल्ह्यातील मनमाड पेट्रोल टँकर पलटी:-मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे

नाशिक जिल्ह्यातील मनमाड पेट्रोल टँकर पलटी:-मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे भारत पेट्रोलियम प्रकल्पातून इंधन भरलेला टॅंकर कंपनी परिसरातीलच ब्रेक दाबण्याचे नादात गाडीचा स्टेरिंग पिळल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटून टॅंकर नालीत पलटी झाल्याची खरी चर्चा टैंकर चालकाने बोलताना सांगितली

सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

टॅंकर मधील हजारो लिटर इंधन पलटी झालेल्या ठिकाणीं खाली नालित वाहून गेले. शेजारीच रस्त्याच्या पलीकडे गॅस प्रकल्प असल्याने मोठी दुर्घटना टळली.तातडीने सुरक्षतेचे उपाययोजना व साधने घटनास्थळी कंपनीचे अधिकारी आणि पोलीस आल्याने त्यांनी फोम व पाण्याचा वापर करून आग लागू नये यासाठी पूर्ण प्रकारची खबरदारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. प्रसंगी मनमाड-नांदगाव रोडवरील दोन्ही बाजूने वाहतूक थांबल्याने दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.त्यामुळे काही काळ कोंडी झाली हजारो नागरिक घटनेचे ठिकाणी जमा झाल्याने पोलिसांना पांगविण्यासाठी मोठी डोकेदुखी झाली यावेळी सोशल डिस्टटिंगचे तीन तेरा वाजले होते.त्यामुळे पोलिसांनी गर्दीला पांगविन्यासाठी मोठी डोकेदुःखी ठरली होती.त्यानंतर दोन क्रेनद्वारे पलटी टॅंकर बाहेर काढण्यात आला.यअपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहे.टैंकर आणि त्यामध्ये असलेले इंधन खाली गेल्याने सुमारे वीस लाखाहुन अधिक रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रसंगी भारत पेट्रोलियमचे प्रकल्प अधिकारी कुलदीप माने,सेफ्टी ऑफिसर जितेंद्र तिवारी आदीसह शेजारच्या ईंधन कंपन्यांचे ही अधिकारी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.तर पोलीस निरीक्षक कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक जांभळे,पोलिस हवालदार शरद दाते,दिलीप निकम,संतोष पागी आदी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button