धनाजी नाना महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सलीम पिंजारी
फैजपूर- स्वतः मधील कला गुणांचा विचार करून जीवनाचे मार्ग ,विद्यार्थ्यांनी शोधावे असे मत मा प्रा डॉ व्ही. आर.पाटील -प्राचार्य, श्रीमती जी जी खडसे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्ताईनगर यांनी तापी परिसर विद्यामंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सव-२०१९-२० पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळाचे व्हा चेअरमन मा प्रा के आर चौधरी होते. यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे पदाधिकारी मा.प्रा.मुरलीधर तोताराम फिरके-सचिव,मा प्रा. पी एच राणे, संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, उपप्राचार्य प्रा ए जी सरोदे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले,स्नेहसंमेलन प्रमुख प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत विद्यार्थी प्रतिनिधी जयेश पाटील, विद्यार्थीनी प्रतिनिधी प्राजक्ता काचकुटे व आमंत्रीत पालक वर्ग,सर्व विद्यार्थी परिषद सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात तापी परिसर विद्या मंडळाच्या व्यापक व उदात्त दृष्टीकोणामुळेच धनाजी नाना महाविद्यालय प्रगती पथावर आहे.असे मत व्यक्त केले.कनिष्ठ महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा वंदना बोरोले यांनी केले तर वरिष्ठ महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा राजेंद्र राजपुत यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयातील विविध विभाग आनी समिती चा लेखा जोखा मांडला. समारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ व्ही आर पाटील पुढे म्हणाले, जीवनाची स्पर्धा अशीच आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण कुठे आहोत याचा विचार केला पाहिजे, ज्या विद्यार्थाना आपल्याला काय जमत नाही. याची जाणीव असते तोच विद्यार्थी समोर जातो त्या स्वतः मधील चांगल्या वाईट कला गुणांचा विचार करून समोरील जीवनाचे मार्ग विद्यार्थांनी शोधावे तेव्हाच जीवनात यशस्वी होवू शकतो.असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतात मा प्रा के आर चौधरी यांनी विद्यार्थांनी पाप पुण्य याचा विचार करण्यापेक्षा आपण ज्या वयात (स्टेज) आहोत त्यांनी ते कार्य करावे, विद्यार्थांनी विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करावा व खूप काही मोठे होण्यापेक्षा माणूस व्हावे असे मत व्यक्त केले.पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ राजेंद्र ठाकरे-राज्यस्तरीय शहीद भगतसिंग भटके-विमुक्त आदिवासी ओबीसी बहुजन समाज भूषण पुरस्कार, डॉ गोविंद सदाशिव मारतळे- राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार,2019 ,डॉ किरण खेट्टे – इंग्रजी विषयात पी एच डी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा राजेंद्र राजपुत- बेस्ट असोसिएट एनसीसी ऑफिसर व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे संघनायक म्हणून मुंबई विद्यापीठात प्रतिनिधित्व केल्याबद्दल सत्कार उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे, डॉ जी जी कोल्हे, डॉ शरद बिऱ्हाडे, डॉ जगदीश खरात डॉ रवी केसुर , डॉ दीपक सूर्यवंशी, डॉ मारोती जाधव, डॉ नितीन चौधरी,डॉ कल्पना पाटील डॉ सरला तडवी, इत्यादी प्राध्यापकांना विविध विषयाचे पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आले. प्रा ससाणे पूर्वी नरेंद्र यांची मानसशास्र अभ्यास मंडळावर निवड व डॉ सरला तडवी यांची वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड, प्रा उत्पल चौधरी यांनी ‘प्रियतम’ व्हिडीओ अल्बमचे दिग्दर्शन केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले. अविष्कार 2019 मध्ये सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल , सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बद्दल, विविध क्रीडा प्रकारात व क्रिकेट खेळासाठी निवड, संगीत विशारद, राज्यस्तरीय वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक, एनसीसी पारितोषिक,कनिष्ठ विभागातून गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये गीताली बाळ होले या विद्यार्थ्यांनी ला 12 वी परीक्षेत सर्वाधिक प्राप्त गुण प्राप्त केल्याबद्दल कै. शंकर चांगो पाटील व कै मातोश्री पार्बती शंकर पाटील पारितोषिक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले.वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी विद्यापीठाच्या परीक्षेत विविध विषयात प्राविण्य प्राप्त व गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल कै धनाजी तोताराम चौधरी पारितोषिक, घनश्याम काशिनाथ पाटील पारितोषिक, केल्याबद्दल भास्कराचार्य पारितोषिक, जावळे पारितोषिक, कै. दगडू गुणा सराफ पारितोषिक,केशवसुत पारितोषिक, शांतादेवी गोविंद चौधरी पारितोषिक, कै परशुराम सुका पाचपांडे पारितोषिक, कै धोंडू आनंदा फिरके पारितोषिक, बी एन चोपडे पारितोषिक, डॉ आर जे पटेल पारितोषिक,कै माधवराव सावसाकडे पारितोषिक, असे अनेक पारितोषिके देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श माता-पिता पुरस्कार काचकुटे प्रकाश हिरामण व सौ सुनंदा प्रकाश काचकुटे यांना देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श विद्यार्थी पुरस्कार- पाटील आर्यन नंदकिशोर, तंटक ईशा राजेश, बामणोदक मंदार विश्वास, प्रजापति भावना गोपाळ इत्यादी विद्यार्थाना देण्यात आला. प्रिन्सिपॉल रोल ऑफ ऑनर पुरस्कार-जावळे महेश सुनील, सोनावणे कृष्णा दिनकर, भाट सुजित रोशन, बाविस्कर सोनल यांना देण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न करण्यासाठी भोजन समिती प्रा विलास बोरोले , सूत्र संचलन समिती डॉ दीपक सूर्यवंशी, स्टेज समिती डॉ रवी केसुर, मंडप आणि बैठक व्यवस्था समिती डॉ नितीन चौधरी, प्रमाणपत्र वितरण समितीचे चेअरमन डॉ योगेश तायडे, प्रा राहुल नारखेडे, डॉ सागर धनगर, अश्विनी वकारे, फोटो हार व स्वागत समिती डॉ मारोती जाधव, निमंत्रण पत्रिका वाटप समिती प्रा आर पी झोपे, शिस्त समिती डॉ जी एस मारतळे, चहा नास्ता समिती प्रा एम बी भारंबे प्रसिद्धी समिती डॉ ताराचंद सावसाकडे यांनी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ डी एल सूर्यवंशी यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी जयेश पाटील यांनी मानले.






