चोपड़ा तालुक्यातील जेष्ठ नेते सहकार महर्षि स्व.धोंडूआप्पा पाटील पुण्यस्मरणा निमित्त माजी आमदार जगदीश भाऊंनी वाहीली श्रद्धांजली
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपड़ा तालुक्यातील जेष्ठ नेते सहकार महर्षि स्व.धोंडूआप्पा पाटील यांच्या नवव्या पूण्यतिथी निमित्त तालुक्यातील रुखनखेड़े येथील त्यांच्या समाधी स्थळावर श्रध्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तालूका भरातून सर्व स्तरातील जनतेची उपस्थिति होती
रुखनखेड़े गावात दिनांक 28 रोजी सकाळी 7वाजता आयोजित श्रधांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी आ.कैलासबापू पाटील माजी आ.जगदीश भाऊ वळवी,माजी आ.दिलीपराव सोनवणे, माजी जी प अध्यक्ष गोरखतात्या,चंद्रहास भाई गुजराथी,घनश्यामअण्णा पाटील, अतुल ठाकरे,डी पी सालुंकेसर,घनश्याम भाऊ अग्रवाल,प्रभाकरअप्पा सोनवणे,एड डी पी पाटील, राजेन्द्र पाटील, सुरेशबापू पाटील, सुनील महाजन यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते याप्रसंगी चोपड़ा तालुक्याचे माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांनी समाधीस्थळावर जावून पुष्प वाहून भावपूर्ण नमन करीत श्रद्धांजलि वाहीली .







