Maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा हजरांचा धनादेश देऊन आईचा वाढदिवस साजरा.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा हजरांचा धनादेश देऊन आईचा वाढदिवस साजरा.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे सावट आहे. अशा स्थितीत कोरोनाचा सामना करित असताना समाजातूनही राज्य व केंद्र सरकारला अर्थिक स्वरूपात अनेक दानशुरांनी मदत करत आपली समाजाप्रती बांधिलकी जपलीय. अशातचं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका दांपत्याने अकरा हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन आईचा वाढदिवस साजरा केलाय.

इंदापूर तालुक्यातील विमल रामलिंग हिंगाणे या वृध्देचा वाढदिवस होता.त्यानिमित्ताने हिंगाणे कुटुंबियांनी हौस मोज वर पैसा खर्च न करता तोच पैसा राष्ट्रहीताच्या कामी लावत अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला.त्या नुसार विमल हिंगाणे यांच्या हस्ते निमगांव केतकीचे मंडलाधिकारी अमोद विचारे,तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांच्याकडे धनादेशाद्वारे ती रक्कम त्यांनी जमा केली. संतोष जाधव, सोमनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

हिंगाणे कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम देण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय स्तुत्य असून कोरोनाशी दोन हात करताना सर्वसामन्य माणूस सुध्दा राज्य व केंद्र सरकारच्या पाठीशी ठाम पणे उभा असून जो तो आपापल्या परीने शक्य ती मदत करित असून इतरांनी ही असे निर्णय घेतले तर कोरोनाचा विरूद्धचा लढा नक्कीच देश जिंकल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button