Chimur

चिमुरात ब्लँक आयविज जखमी पक्ष्याला जीवनदान –:::पक्ष्याचे उपचार करुन वनविभागाच्या स्वाधीन

चिमुरात ब्लँक आयविज जखमी पक्ष्याला जीवनदान –:::पक्ष्याचे उपचार करुन वनविभागाच्या स्वाधीन

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमुर–:: चिमुरात एक दिवसाअोदर मेघ गर्जनेसह वादळी पाऊस झाला. जोरदार वादळी पावसामुळे अनेकांचे छप्पर व घरे काही क्षणात उध्वस्त झाली. यामध्ये अनेकांना जीवसुद्धा गमवावा लागला. या वादळी व गारपिटी चा फटका ़मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना सुद्धा बसला. चिमुरातील व्यापारी लाईन मध्ये असलेल्या स्टेट बँक आँफ इंडिया या बँक च्या ए. टि. एम. मध्ये वादळी पाऊस व गारपिटी मुळे ब्लँक आयविज पक्षी जखमी अवस्थेत पडुन होता. याची कल्पना पक्षी प्रेमि कवडू लोहकरे यांना फोन ने गावकऱ्यांनी दिली. या पक्ष्याच्या पंखाला जखम होती. तो उडु शकत नव्हता. कवडू लोहकरे यांनी वनविभागाला पाचारण केले. पशुवैद्यकीय विभागाकडून जखमी पक्ष्यावर उपचार करण्यात आले. व वनविभागाकडे स्वाधीन करण्यात आले.

यावेळी पक्षी प्रेमी व पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, चिमुर वनविभागाचे वनरक्षक नैताम, वनरक्षक गायकवाड उपस्थित होते.निखिल भालेराव,, आशिष ईखारे आदीनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button