मेंढपाळाना स्थंलातरास विनाअट शासनाची परवानगी-
खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाला यश
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :यशवंतसेनेचे वतीने खा.धैर्यशील माने (दादा) यांचे जाहीर आभार मानन्यात आले
महाराष्ट्रातील धनगर व सर्व , मेढंपाळ बांधवाना विनाअट बिनशर्थ महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हात पशुधन मेंढरे शेळी यांना स्थलांतर करून चरण्यासाठी सर्व ठिकाणी शेतकरी अग्रीक्लचरल प्रमाणे परवानगी देण्यात यावी.अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली हाेती त्याप्रमाने आदेश महाराष्ट्राचे प्रधान सचिव .भूषण गगराणी विभागीय आयुक्त मा. दिपक म्हैसेकर यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकारी पोलिस महासंचालक, जिल्हापाेलिस प्रमुख , पशुसवर्धन सचिव प्रांताधिकारी ,तहसिलदार यांना देण्यात आले आहेत.
गेली अनेक दिवस झाले जिल्हातुन पर जिल्हात जाण्यास मेंढपाळना परवानगी नव्हती याबाबत यशवंतसेनेचे वतीने शिष्टमंडळ हातकणंगले खासदार .धैर्यशिल माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांना निवेदन देवुन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणी व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांचेशी सपर्क करून आदेश काढण्यासाठु प्रयत्न केले .यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ धनगर समाज बांधव यांना झाला गेली तीन महिने झाले प्रत्येक जिल्हात धनगर मेंढपाळ अडकून बसले होते त्या मेंढपाळाना गावी येण्यास काेणतीही अडचण येणार नाही . खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे.धनगर समाज बांधवातुन काैतुक हाेत आहे.यावेळी इचलकंरजी शिवसेना उपशहर प्रमुख राजुदादा आरगे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय वाघमाेडे, राम कोळेकर ,प्रा.लक्ष्मण करपे,संभाजी गावडे,अनिल वळकुंजे, संभाजी शिनगारे ,जगन्नाथ माने, काशिनाथ शिनगारे सुनिल सलगर संदिप हजारे, राजेश तांबवे,कृष्णत शेळके, डॉ. गोरड,प्रकाश मेटकरी, अमोल मेटकर, अरुण फोंडे, बाळासाहेब मोटे,कैलास काळे,सचिन देशिंगे विकास घागरे मच्छिंद्र बनसाेडे इत्यादी उपस्थित हाेते.






