चांदवड शहरातील आस्थापनांनी नियमांचे पालन करावे- मुख्याधिकारी अभिजित कदम
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड शहर व परिसरातील आस्थापना बाबत नगरपरिषद मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांनी एक आदेश आज प्रतिनिधींना कळविला आहे त्यात नमूद आहे की चांदवड नगरपरिषद हद्दीतील आठवडे बाजार बंद असून 1) भाजीपाला विक्रेत्यांसाठी सोमवार ते शुक्रवार वेळ सकाळी 8 ते 11 राहील. 2) जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 11 यावेळेस सुरू राहतील.3) मेडिकल व वैद्यकीय आस्थापना यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाही. शनिवार व रविवार चांदवड नगरपरिषद हद्दीतील सर्व आस्थापना बंद राहतील. सर्व आस्थापनांनी/दुकानदारांनी अँटिजेंन चाचणी करणे बंधनकारक आहे तसेच सर्व आस्थापना यांनी कोविड 19 च्या बाबतीत शासनाने दिलेले सर्व निर्देश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.






