Amalner

Amalner: दोन वेगवगळ्या ठिकाणांहून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना..!

Amalner: दोन वेगवगळ्या ठिकाणांहून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना..!

अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथून एका आणि शहरातील खाजा नगर परिसरातील एका अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडल्या आहेत. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील सोनखेडी येथील शीतल शांताराम भिल (वय 17 वर्ष) रा. सोनखेडी ता. अमळनेर ही 15 रोजी रात्री घरात झोपलेली होती.मात्र रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास तिच्या आईला ती दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे अशी तक्रार शांताराम दशरथ भिल यांनी दिली आहे. त्यानुसार अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हे कॉ सुनील
जाधव करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अमळनेर शहरातील खाजा नगर भागातील बंगाली फाईल येथील नाजीया उर्फ अनु शेख अहमद वय 15 ही 17 रोजी सकाळी साडे तीन वाजता बाथरूमला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर निघाली मात्र बऱ्याच वेळानंतर ती परत न आल्याने तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असून मुन्नी शेख रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हे कॉ कपिलदेव पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button