Amalner : मेलेल्या कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात बालेमिया ट्रस्ट तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन…!
मेलेले डुकरे व मेलेले कुत्र्यांचा बंदोबस्त करणे बाबत बालेमिया ट्रस्ट व मुस्लीम यांनी विनंतीवजा निवेदन अर्ज अमळनेर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात गंगाघाट भागातून आपले काही कर्मचारी दर्म्याच्या परिसरात मागच्या बाजुने न.पा. ओपन जागेतून मेलेले डुकरे व मेलेले कुत्रे बालेमिया दरगाह परिसरात फेकतात व त्यामुळे दुगंधी व वास येतो तसेच धार्मीक भावना दुखावतात तसेच काही नागरीकांनी अतिक्रमण केलेले आहे. तरी सर्व तक्रारींचे निवारण करणे कायमस्वरुपी भिंत बांधुन देणे कारण की, ओपन असलेने तेथे मेलेले कुत्रे व मेलेले डुकरे फेकतात यांची दखल घेवून आमची अडचण दुर व त्वरीत कारवाई करावी. तसे न केल्यास आम्हाला न.पा. वर मोर्चा घेवून येणार व तीव्र आंदोलन करणार व होणाऱ्या परीणामांस न.पा. प्रशासनच जबाबदार राहील याची करावी नोंद घ्यावी.निवेदनावर समीर शेख,उ वकारली,फिरोज मिस्तारी,रफिक मिस्तारी,कामिल खान,सुनील चांडाळे, मुसा खाटीक इ च्या सह्या आहेत.






