Amalner: सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अमळनेर येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले..
सानेगुरुजी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.
प्रस्ताविक संचालक ईश्वर महाजन यांनी केले.
यावेळी वाचकांसाठी साने गुरुजींचे साहित्य व पुस्तक उपलब्ध करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे कर्मचारी सीमा धाडकर,व कर्मचारी सह वाचक
दशरथ सूर्यवंशी, देवानंद लांडगे ,भागवत चौधरी, रोहिदास पाटील, प्रियंका महाजन सह अनेक वाचनालयाचे वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






