Maharashtra

तालुक्यातील केऱ्हले येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल भास्कर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना १० हजार मास्कचे वाटप केले

तालुक्यातील केऱ्हले येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल भास्कर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना १० हजार मास्कचे वाटप केले

प्रतिनिधी शकील शेख

तालुक्यातील केऱ्हले येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल भास्कर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना १० हजार मास्कचे वाटप केले आहे. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत अनेक योजना आखत असल्याचे दिसत आहे. तसेच नागरिकांनी स्वतः काळजी घेण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा याबाबत देखील ते जनजागृती करत आहे.
चीन,इटली,स्पेन,फ्रांस,अमेरिकासह जगभरात कोरोना कोविंड-१९ आजराने थैमान घातले आहे.भारतात देखील हा आजार हळूहळू पाय पसरवत आहे.त्याला रोखण्यासाठी नागरिकमध्ये जनजागृती झाली पाहिजे.याकाळात विनाकारण बाहेर पडू नये,काही कारणास्तव बाहेर पडल्यास तोंडाला मास्क व उपाय योजना करून बाहेर पडणे आवश्यक आहे, तसेच ग्रामीण भागात गरजू लोकांना मास्क वाटप केली जनजागृती केऱ्हाळे येथील सरपंच राहुल पाटील व पोलीस पाटील वर्षा पाटील घरोघरी जाऊन करत आहे.रविवारी ग्रामस्थांना मास्क चे वाटप सुरू केले असून,१० हजार मास्क वाटपाचे उदिष्ट त्यांनी आखले आहे.तसेच गावा मध्ये दररोज भरणार बाजार सुद्धा बंद करण्यात आला आहे .यावेळी गावातील आशा सेविका व अमोल गणेश पाटील तसेच सहकारी सदस्य उपस्थित होते.
फोटो-मास्क वाटप करताना सरपंच राहुल पाटील व पोलीस पाटील वर्षा पाटील तसेच आशा वर्कर दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button