चांदवड तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
चांदवड उदय वायकोळे
चांदवड तालुक्यात 17 सप्टेंबर 2020 पासून पंचायत समिती सभापती श्रीमती पुष्पा धाकराव यांच्या हस्ते माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कोव्हीड रुग्ण शोध मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी सांगितले की माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्दी,ताप,खोकला याबद्दल योग्य माहिती देऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.चांदवड शहर व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आशासेविका नागरिकांची तपासणी करत असल्याचे दिसत आहे.उदघाटन प्रसंगी डॉ नितीन गांगुर्डे,विजय धाकराव आदी उपस्थित होते.मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सहायक व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.






