Faijpur

फैजपूर येथे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी वाढ याबद्दल काँग्रेस चे रास्ता रोको आंदोलन

फैजपूर येथे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी वाढ याबद्दल काँग्रेस चे रास्ता रोको आंदोलन

फैजपुर वार्ताहर

फैजपूर – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या आदेशानुसार फैजपूर येथे आ. शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्वाखाली महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी वाढ व केंद्राच्या जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी सुभाष चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जी. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, युवा नेते धनंजय चौधरी, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी केंद्रातील धोरण, घरगुती गॅस दरवाढ, वीजबिल वाढ, जीवनावश्यक वस्तूवरील 5 टक्के जी. एस. टी. वाढ झाल्याबद्दल घोषणा देण्यात आल्या. धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर जी पी पाटील तसेच
फैजपूर गटनेते कलीम मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, फैजपूर शहराध्यक्ष शेख रियाज, यावल शहराध्यक्ष कदिर खान, महिला आघाडी चंद्रकला इंगळे, चंद्रशेखर चौधरी, युवक चे वसीम तडवी, जंजाळकर, हर्षल दानी, आसिफ मेकॅनिकल, सरफराज तडवी, इरफान मेंबर, सेवा दल चे भरत कुवर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस गणेश गुरव सर यांनी सर्वांचे आ8भार मानले. ग्रामीण व शहर कॉग्रेस कमिटी चे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला कॉग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्याक कॉग्रेस, मागासवर्गीय विभाग पदाधिकारी, इत्यादी कार्यकते उपस्थित होते यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर पीएसआय लोखंडे एस आय हेमंत सांगळे चेतन महाजन सलीम तडवी यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button