Nashik

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाच्या 09 विद्यार्थ्यांना EPIROC Mining India Pvt. Ltd. कंपनीकडून शिष्यवृत्ती जाहीर…

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाच्या 09 विद्यार्थ्यांना EPIROC Mining India Pvt. Ltd. कंपनीकडून शिष्यवृत्ती जाहीर…

परम पूज्य श्री आत्मा मालीक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने, समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाने कार्यरत असणाऱ्या मोहिली- अघई, शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाच्या 09 विद्यार्थ्यांना, एम. आय. डी. सी. सातपूर, नाशिकस्थित एपिरोक मायनिंग इंडिया प्रा. लि. या प्रथितयश कंपनीच्या सामाजिक दायित्व जबाबदारीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

दिनांक ०९ जून २०२३ रोजी, नाशिकस्थित EPIROC Mining India Pvt. Ltd. या बहुराष्ट्रीय कंपनीत, कंपनीच्या विद्या सहयोग शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. अरविंद पाटील, मॅनुफॅक्चरींग हेड श्री. मनीष तिवारी, एच आर मॅनेजर श्रीमती पल्लवी पांडे, सी. एस. आर. टीम विभागातील श्री. संदीप बागले, श्री. संजय भुसे, श्री. राजेंद्र लोळगे, श्री. धनाजी पुरी, श्री. ललित शिरसाठ, कामगार संघटना प्रतिनिधी श्री. आर. वाय. पाटील आदी तर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संस्थेच्या वतीने आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. शिंदे, प्रा. उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
इपिरोक कंपनीच्या वतीने एच आर मॅनेजर श्रीमती पल्लवी पांडे यांनी इपिरोक कंपनीबद्दल माहिती दिली व प्रास्ताविक मांडले व प्लेसमेंट संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर श्री. राजेंद्र भुसे यांनी सूत्र संचालन केले.
सदर कार्यक्रमात कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. अरविंद पाटील यांच्या हस्ते निवडकर्त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹२५००० रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. दरवर्षी शिष्यवृत्तीची रक्कम ₹२५००० असे शिष्यवृत्तीचे स्वरूप असून सदर विद्यार्थी EPIROC मेंटरशिप प्रोग्रामसाठी देखील पात्र झाले असून सदर विद्यार्थ्यांना याच कंपनीत पुढे नोकरीची संधी मिळू शकते. विद्या सहयोग शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून विविध महाविद्यालयातील एकूण ३५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली त्यात आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे ०९ विद्यार्थी पात्र ठरले.
या प्रसंगी कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. अरविंद पाटील यांनी निवडकर्त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत EPIROC कंपनी यापुढेही सामाजिक दायित्व म्हणून विविध प्रकारे असेच योगदान देईल अशी ग्वाही दिली व विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करत त्यांना प्लेसमेंट साठी सहाय्य करण्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच यापुढे नेहमीच सर्वांगीण योगदान देण्यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. एपिरोक कंपनीचे संदीप बागल यांचे सदर योजना आत्मा मालीक च्या मुलांना मिळवून देण्यात विशेष सहकार्य लाभले.
वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य डॉ. डी. डी. शिंदे यांनी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संस्थेच्या ध्येय, धोरणे, उद्दिष्ट्ये, कार्यान्वित प्रकल्प यावर प्रकाश टाकत, कौशल्य विकास, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन, ट्रेनिंग, प्लेसमेंट अशा विविध विषयांवर भाष्य केले व एपिरोक कंपनीप्रती आभार व्यक्त केले.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संस्थेच्या वतीने महाविद्यालयाचे सीएसआर समन्वयक प्रा. उल्हास पाटील यांनी संस्थेच्या अध्यात्म, योग व ध्यान या त्रिसूत्रीवर आधारित समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यासाठी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची व सामाजिक बांधिलकीची माहिती देत संस्थेच्या वतीने एपिरोक कंपनीप्रती आभार व्यक्त केले.
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत एपीरोक कंपनीचे व महाविद्यालयाचे आभार मानले.

संपूर्ण शिष्यवृत्ती निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडली उदा. विद्यार्थी फॉर्म आमंत्रण, स्क्रीनिंग आणि अंतिम निवड. अंतिम निवड विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती यावर आधारित होती. सदर प्रक्रियेत अम्रित महाविद्यालयामधील CSR समन्वयक प्रा. उल्हास पाटील, प्रा. योगेश्वरी हरदास, प्रा. महेश रत्नपारखी या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले.
Epiroc CSR समितीने सर्व छाननी केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन मुलाखत घेतली आणि शेवटी Epiroc CSR समितीने ठरविलेल्या प्रक्रियेनुसार Epiroc शिष्यवृत्ती पुरस्कार कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ही शिष्यवृत्ती सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत वाढविली जाऊ शकते.
सदर सीएसआर कार्यक्रमासाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांचे प्रोत्साहन प्राचार्य डॉ डी डी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रा. उल्हास पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
सर्व निवडकर्ते विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आत्मा मालिक ध्यानपिठाचे आदर्शवत कार्याप्रतीत सदगतीत भावनेने आभार मानत कृतकृत्य होत समाधान व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांनी सर्व निवडकर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button