Amalner Election 2025: तिकिट मिळविण्यासाठी दाखवू का व्हिडिओ…? शहरात व्हिडिओ ची जोरदार चर्चा ..!
अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी पहिल्यांदाच अनुसूचित जमाती साठी अमळनेर नगराध्यक्ष पद राखीव जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय पक्षांनी मांडलेला तिकिटांचा बाजार सर्वांनाच धक्का देऊन गेला आहे. राजकीय पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी साम , दाम,दंड,भेद या सर्वांचा वापर केला असल्याची चर्चा शहरात जोरदार रंगली आहे. यातच एका उमेदवाराने तिकीट मिळविण्यासाठी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅक मेल केल्याची ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या काही मिनिटात या व्हिडिओ पत्त्याचा दुरुपयोग करून तिकीट मिळविल्याची जोरदार चर्चा आणि टीका शहरात प्रत्येक चौकात, कट्ट्यावर सुरू आहे. यामुळे इतर पात्र उमेदवारांना डावलून संबंधित उमेदवाराला तिकीट दिले गेल्याचे बोलले जात आहे.
नागरिक आता चिंतीत झाले असून अश्या उमेदवाराला मतदान करावे का असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आधीच संबंधित व्यक्ती तोडी पाणी, ब्लॅक मेलिंग आणि खोटे गुन्हे दाखल करून लोकांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम करत असते हे अनेक लोकांना माहीत आहे. त्यामुळे विनाश काले विपरीत बुद्धी झाली असून शहरातील अधिक तर सुशिक्षित, व्यापारी, ह्या व्यक्तीच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. काही नागरिकांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून असा उमेदवार जर निवडून आला तर शहराचे भविष्य अधंकारमय असल्याचे ही मत व्यक्त केले आहे. अनेकांना नडलेल्या या उमेदवाराबद्दल सर्व साधारण जनतेत चीड असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर ज्या पक्ष नेत्याला तिकिटासाठी अडविले आहे ते देखील आतून वेगळा गेम करू शकतात असेही बोलले जात आहे. शेवटी काय तर जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही…






