Nashik

Nashik: नविन नाशिकमधील सकल मराठा समाज आक्रमक.. अंबड पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

नविन नाशिकमधील सकल मराठा समाज आक्रमक..अंबड पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

नाशिकशांताराम दुनबळे
नाशिक-: जालन्यातील अंतरवाली सराटी या गावी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर झालेल्या अमानुष लाठीमारचा निषेध नोंदवून नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज रोजी नविन नाशिक परिसरात बंदची हाक पुकारण्यात आली होती.या वेळी नविन नाशिक सकल मराठा समाज यांच्यावतीने त्रिमूर्ती चौक,रायगड चौक,पवन नगर,या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली.येथील व्यापारी, दिव्याअडलाब सिनेमा गृह,छोटे-मोठे व्यवसायिक यांनी बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे चित्र बघायला मिळाले.

नविन नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारच्या सुमारास विविध भागात फिरून बंदचे आवाहन केले. अचानक मराठा समाजाचे बांधवांनी बंदचा आग्रह केल्याने बाजारपेठेत धावपळ निर्माण झाली.सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावर जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे बांधवांवर अमानुष लाठीहल्ला करून अनेकाना जखमी केले.याचे पडसाद महाराष्ट्रातील सर्व जिल्हा,तालुका स्तरावर पडले.विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी जालना येथे जाऊन आंदोलकांची व जखमींची विचारपूस केली.सकल मराठा समाजाच्या वतीने या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी तीन मार्च रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी नाशिक शहरात भव्य मोर्चा काढून बंद पाळण्यात आला.नविन नाशिक भागात फिरून दुकानदारांना व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने बंद आवाहन केले.अचानक मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरल्याने दुकानदार व हातगाडी चालकांची एकच धावपळ उडाली. जमावाच्या भीतीपोटी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करणे पसंत केले. काही काळ वर्दळ निर्माण झालेल्या रस्त्यावर अचानक शुकशुकाट दिसून आला.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिकांनी खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठा पोलीस फाटा तैनात केला होता.

यावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सुविधा असणारे हॉस्पिटल,ॲम्बुलन्स,मेडिकल यांना कोणताही त्रास न देता चालू ठेवण्यास सांगितले.नविन नाशिक सकल मराठा समाजाचे आशिष हिरे,योगेश गांगुर्डे,संजय भामरे,विजय पाटील,मुकेश शेवाळे,अभय पवार,उमेश चव्हाण,कृष्णा काळे,सुमित पगार,सागर पाटील,शुभम महाले,सागर जाधव,अर्जुन शिरसाठ,मनोज वाघ,विशाल पगार,प्रमोद पाटील ज्ञानेश्वर नरवडे यांसह नविन नाशिक सकल मराठा समाजाचे पदधिकारी ह्या बंदमध्ये सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button