India

आरोग्याचा मुलमंत्र..गरम पाणी पिण्याचे फायदे

आरोग्याचा मुलमंत्र..गरम पाणी पिण्याचे फायदे

आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे माहित असेलच की गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी गरम पाणी प्यायलं की नेहमीच अधिक फायदेशीर असतं. गरम पाणी पिण्यामुळे सर्व शारीरिक कार्य सहजतेने पार पडायला मदत होते. लिंबू आणि कोमट पाणी सकाळी पिण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण थंड पाणी प्यायलो तर त्याचा काही जास्त फायदा होत नाही, ते पाणी फक्त तुमची तहान भागवते. बरेच लोक रात्री गरम पाणी पिणं टाळतात, पण तुम्ही रात्रीसुध्दा गरम पाणी पिऊ शकता हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.
निरोगी आरोग्यासाठी नियमित ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, हा सल्ला तुम्ही आतापर्यंत असंख्य वेळा ऐकला असेल. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच. गरम पाणी पिणे केवळ आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी भरपूर लाभदायक असते. आपली त्वचा कायम सुंदर दिसावी, यासाठी कित्येक सेलिब्रिटी मंडळी देखील हा सोपा उपाय फॉलो करतात.

पण जर तुम्ही अद्याप गरम पाणी पिण्यास सुरुवात केली नसेल तर आजपासून हा उपाय करा. कोमट किंवा गरम पाणी पिण्याचे एक नाही असंख्य फायदे आहेत. यामुळे रक्तदाबापासून ते पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. शरीरातील रक्त प्रवाहही वाढतो. या सर्व प्रक्रियांचा आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.

फायदे :-

– सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते.

– गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ह्याने कफ और सर्दी लवकर दूर होतात.

– वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

– नेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करत.

– दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथीक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button