स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार व जिजाऊरत्न पुरस्कार देऊन जयंती साजरी
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.रावेर. जि. जळगांवनंदुरबार – महाएनजीओ फेडरेशन पुणे ,सोशल रिस्पॉन्सबिलिटी समूह पुणे व युवकमित्र परिवार तर्फे राजमाता जिजाऊ जयंती, तथा युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले… यावेळी राज्यातील सामाजिक बांधलकी या नात्याने निःस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या युवक व युवतींना *स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार व जिजाऊरत्न पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील आदिवासी भागात कार्यरत असलेली शारदाई फॉउन्डेशन उमराणी बुद्रुकचे संस्थापक तथा आदिवासी विद्यार्थी एकता परिषद धडगावचे अध्यक्ष *श्री. जगदिश लुवाऱ्या पावरा* यांना यांच्या आदिवासी भागात समाज प्रबोधन, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, वन संवर्धन, आरोग्य, विविध उपक्रम, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तथा शिक्षणापासुन वंचित न ठेवता आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निःस्वार्थ मनाने सामाजिक कार्य करत आल्यामुळे त्यांना यंदाच्या *स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले…. यावेळी राज्यातील अकरा जणांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…
यावेळी भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई,ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे,माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी,महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रसंगी महाएंनजिओ फेडरेशनचे सहसंस्थापक विजय वरूडकर, मुकुंद शिंदे,युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन,मनोज वारुडे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.






