अण्णाभाऊ साठे जयंती साजरी व शिवसेना नोंदणी अभियानाला सुरुवात
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका
शहरात सातशे शिवसेना सदस्यांची नोंदणी झाली असून नोंदणी अभियान सुरू राहील
शहरातील भोईवाडा व मातंग वाडा जवळ अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन शिवसेना महिला तालुकाध्यक्ष रजनी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. प्रत्येकाने समाजाने राष्ट्रपुरूषाची जयंती साजरी करावी. यांचे विचार कार्य समाजापुढे नेण्यात यावे. शहरात शिवसेना नोंदणी अभियान व्यापक राबवणार. असे रजनी चौधरी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला आप्पा उदय चौधरी, यावल तालुका महिला शिवसेनाप्रमुख रजनी चौधरी, नितीन कोळी, एडवोकेट आकाश चौधरी,शिव सेना उपशहर मनोज चंदनशिव, भारत चौधरी, ज्योती चंदनशिव, गिताबाई चंदनशिव, निशा चंदनशिव, सूनंदा भाई , लक्ष्मी चंदनशिव, मीना चंदनशिव, पूजा बिराडे, मनाबाई चंदनशिव, कविता चंदनशिव, हिरामण चंदनशिव, काशिनाथ चंदनशिव, अशोक चंदनशिव, उखनबाई चंदनशिव , प्रतिभा चिरमाडे, मोहन चंदनशिव, माधव चंदनशिव, आकाश भाई, कैलास भाई,फिराज खान, आरशद शेख, इलियास शेख






