? SHE नेटफ्लिक्स वरील मालिका..महिला पोलिसांचं बीभत्स चित्रण अयोग्य
प्रा जयश्री दाभाडे
सध्या कोरोना विषाणूच्या प्रसार होतो आहे आणि त्यामुळे घरातच राहायची वेळ आली आहे.नुकतीच नेटफ्लिक्स वर सुरू असलेली “she ” नावाची मालिका पाहिली ही मालिका सध्या भारतात जबरदस्त टी आर पी घेते आहे.
ही मालिका महिला केंद्रीत आणि यातील मुख्य पात्र मुंबई पोलीस मध्ये काम करणारे आहे. ह्या मालिकेचा गाभा मुंबई पोलीस मध्ये
करणाऱ्या महिला पोलिस कांस्टेबल वर आहे .
एका ओळीत कथा सांगायची झाली तर
ड्रग्सचे रैकेट उध्वस्त करण्यासाठी या महिला पोलिस शिपाई “under cover” म्हणून Prostitute म्हणून काम करते आणि शेवटी ती त्या डॉनसह शय्या सोबत करते. ही वेब सीरीज पाहिल्यानंतर
बराच वेळ काही सुचत नव्हतं आणि सुचलं नाही.मन आणि डोकं सुन्न झालं होतं.मुंबई त कार्यरत असताना मुंबई त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना जवळून पाहिलं आणि अनुभवलं आहे.

त्यातल्या त्यात मुंबई पोलीस मध्ये काम करणाऱ्या महिलांचे खूप हाल आहेत.विशेष म्हणजे मुंबई मध्ये काम करणाऱ्या बहुतांशी महिला पोलिस या ग्रामीण भागातून येतात.
ग्रामीण भागात मुलींना करियर करण्यासाठी खूप संघर्ष आजही करावा लागतो. सहज त्यांना करियर करता येत नाही.महिला पोलिस म्हणून रुजू झाल्यावर त्यांना घरी आणि कर्तव्याच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या हा एक स्वतंत्रअभ्यासाचा विषय आहे.
ग्रामीण भागात पुरुषही पोलीस नवरा नको असतो त्यात महिला पोलीस म्हटल्या नंतर तर लग्नाच्या बाजारात खूप मोठी समस्या असते. बायको पोलिस खात्यातली नको असते. लग्नानांतर संशयाची सई
सतत तिच्यावर असते. अगदी चांगला शिकलेला, उच्च विचारांचा नवरा देखील काही गोष्टी खपवून घेत नाही तर पारंपारिक
बुरसटलेल्या विचारसरणीच्या नवरा आणि वातावरणात घर आणि काम सांभाळने महिला पोलिसांना फार तारेवरची कसरत करावी लागते. पुरुष प्रधान संस्कृती, बुरसटलेल्या विचरांचाच समाज,मनु वादी
वृत्तींना तोड देणं इ समस्या तिच्या समोर असतात. आधीच तिच्या अनेक
समस्या असताना आणि त्यांना सामोरं जात ती तिचं कर्तव्य करत तिचा संघर्ष चालू असताना तिचे असे चित्रीकरण म्हणजे तिच्या समस्यांमध्ये अजून वाढ करणारे तर आहेच पण शिवाय तिचा मान सन्मान, प्रतिशत6,पदाची गरीमा, समाजात त्यामुळे जाणारा संदेश,तिच्या कडे बदलणारा पाहण्याचा दृष्टिकोन (जो आधीच स्त्री म्हणून दूषित आहे) इ घटक महत्वपूर्ण आहेत.
आता लॉक डाउनच्या काळात ही वेब सीरीज ग्रामीण भागातही बघितली जाणार,आणि मुंबई महिला पोलिसांना हे ही काम करावं लागतं यावर
चर्चा होणार. खास पुरुषी माहितीची देवाणघेवाण
होणार. या वेळी सुट्टीत गावी येणाऱ्या महिला
पोलिसला तू मुंबईत काम करते होय असे म्हणून
खालपासून वर पर्यंत बघितले जाणार,
इतकेच नव्हे तर एखाद्याची बायको पोलिस शिपाई असेल तर, बघ
बाबा तुझी बायको नक्की काय करते असे आडुन
आडून विचारले जाणार.
घरातल्या संशयी नवऱ्याने ही सीरीज बघितली
असेल तर.घरात प्रत्येक वेळी उशिरा पोहोचल्यावर
नवऱ्याच्या संशयी नजरेचा सामना करावा लागणार.
क्राइम ब्रांच/DB /Narcotics मध्ये काम करणाऱ्या
WPC ना तर त्यांचे पुरुष/स्त्री दोन्ही सहकार्यांकडून Direct -Indirect गॉसिप ना अजून तोंड द्यावे लागणार.
आधीच स्त्री ही दुय्यम आणि उपभोग्य वस्तु
असल्याची आपली भारतीय मानसिकता या सर्वां मुळे महिलांची प्रतिष्ठा ‘इमेज’ धोक्यात आहे त्यात ह्या वेब सिरीज मुळे त्यात भरच पडत आहे.
भारतात टी व्ही मालिका,वेब सिरीज,you tube इ चा फार लवकर आणि मोठा परी6होतो हे अनेक उदा वरून सिद्ध झाले आहे.
प्रत्यक्षात भारतीय लोक अजुन तेवढे प्रगल्भ नाहीत.
टीव्ही वरील महिला पोलिसांचं चित्रण नेहमीच थोडं हलक्या दर्जाचं असतं
लो वेस्ट युनिफॉर्म.,त्यांच्या यूनिफार्म
च्या स्लीव्स देखील कित्येकदा कमी असतात.
प्रत्यक्षात परिस्ट8खूप वेगळी असते. या देशात अंधानुकरण लवकर होते चुकीची गोष्ट लवकर सनजते त्यामुळे अश्या वेब सिरीयल मधून महिलांचं हे बीभत्स चित्रण किती योग्य आहे?अश्या वेळी महिला संघटना कुठे जातात?त्या का आवाज उठवत नाहीत?असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
8 मार्च ला एक दिवस बाई चे उदात्तीकरण करायचे तिचे गोडवे गायचे तिला देवी म्हणायचे आणि उरलेले 364 दिवस तिला उपभोग्य वस्तु समजून तिच्याशी वागायचे, बोलायचे, तिचे वरपासून खालपर्यंत स्कॅनिंग करायचे,तिचे विभत्स चित्रीकरण करायचे. हीच तथाकथित संस्कृती आहे का? अश्या सिरियल्स वर बंदी आणणे आवश्यक आहे की जेणे करून कोणत्याही क्षेत्रात कार्यरत महिलांना सन्मानाने जगता येईल.






