Nashik

समाजसेवीका मेघा डोळस यांची “महाराष्ट्र उपाध्यक्षा ” म्हणुन नियुक्ती ..!

समाजसेवीका मेघा डोळस यांची “महाराष्ट्र उपाध्यक्षा ” म्हणुन नियुक्ती ..!

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने नाशिकच्या समाजसेवीका तसेच “तेजस फ़िल्म फाउंडेशन ” च्या संस्थापिका मा.श्रीमती मेघा डोळस यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर मा.चंद्रकात आल्हाट – नाशिक सहचिटणीस ,मा. राहुल खरात – पुणे प्रसिद्धी प्रमुख , प्रसाद कडव – रायगड -सांगली प्रसिद्धी प्रमुख आणी मा.मिर्झागालिब मुजावर – सोलापूर प्रसिद्धी प्रमुख अश्या सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्या. या प्रसंगी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब गोरे , मुंबई अध्यक्ष मा.श्री.देवेंद्र मोरे , खजिनदार मा.श्री.प्रसन्न नागावकर , सिने-नाट्य दिग्दर्शक -पत्रकार मा.श्री.महेश्वर तेटांबे , अभिनेता मा.श्री.सुरेश डाळे-पाटील , दिग्दर्शक मा.श्री.प्रवीण भगत , समाजसेवक मा.श्री.चंद्रकात आल्हाट , श्री.राजेंद्र बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button