Amalner : जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा संपन्न…
अमळनेर १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात जागतिक एड्स पंधरवाडा साजरा केला जातो.अमळनेर शहरात या पंधरवड्या निमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभाग, ए आर टी विभाग आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
काल दि. ८ डिसेंबर रोजी ही स्पर्धा रोटरी हॉल मध्ये घेण्यात आली.
या रांगोळी स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक: प्रियंका परदेशी – १००० रुपये
द्वितीय क्रमांक: मयुरी बारी – ७५० रुपये
तृतीय क्रमांक: स्नेहल पाटील – ५०० रुपये
उत्तेजनार्थ: प्रेरणा लिंगायत – ५०० रुपये
तर पोस्टर मेकिंग स्पर्धे तील विजेते
प्रथम क्रमांक: ज्योती भोई – १००० रुपये
द्वितीय क्रमांक: सोनू तेजी – ७५० रुपये
तृतीय क्रमांक : आशा जाधव – ५०० रुपये
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून श्री. डी. एन. पालवे (चित्रकला शिक्षक, डी आर कन्या हायस्कूल अमळनेर) उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉक्टर जी. एम. पाटील, डॉक्टर पी के ताळे, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर शरद बाविस्कर, डॉक्टर सुमित पाटील, आणि डॉक्टर राजेंद्र ठाकरे इ उपस्थित होते.






