Mumbai

? Big Breaking…अलेक्सा शी बोलताना जरा सांभाळून …समोर असतील आता बॉलिवूड चे शहेनशहा बिग बी…

अलेक्सा शी बोलताना जरा सांभाळून …समोर असतील आता बॉलिवूड चे शहेनशहा बिग बी…

पी व्ही आंनद

मुंबई अमेझॉन ची अत्यन्त प्रसिद्ध प्रॉडक्ट अलेक्सा या डिव्हाइसला आता बिग बी म्हणजेच खुद्ध अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. बीग बी यांचा आवाज खूप दमदार आणि विशिष्ट ओळख असलेला आवाज आहे. भारतीय प्रेक्षकांमध्ये बिग बी चा आवाज हा खूप लोकप्रिय आहे. अलेक्सामध्ये बच्चन यांचा आवाज येत्या वर्षांपासून ऐकायला मिळेल अशी माहिती अमेझॉन अलेक्साचे भारतातील प्रतिनिधी पुनिष कुमार यांनी दिली आहे आहे.

अमेझॉनच्या अलेक्सामध्ये बिग बी यांच्या आवाजात जोक, हवामानाच्या बातम्या, शायरी, मोटिवेशनल कोट्स अशा बऱ्याच गोष्टीचा खजिना असणार आहे. अलेक्साची टीम बच्चन यांच्याबरोबर काम करणार आहे. ते कसे बोलतात, तसेच त्यांच्या बोलण्यातील उच्चार आवाजाचा चढ उतार इ चा बारकाइने अभ्यास करून ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे.अमेरिकेमध्ये अलेक्सासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी आपला आवाज दिला आहे. त्यात सॅम्युएल जॅक्सन सारख्या मोठ्या सेलिब्रिटी चा समावेश आहे. बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज घेऊन हा प्रयोग केला जात आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना अमिताभ बच्चन म्हणाले की
मला नेहमीच नवीन काहीतरी करण्याची आवड आहे. या वेळी अॅमेझॉन च्या प्रसिद्ध अलेक्साला आवाज देण्यासाठी मी खुप उत्सुक आहे. हा प्रयोग माझ्या हितचिंतकांना आणि फॅनसना नक्की आवडेल अशी मी अशा करतो. अमेझॉन चे अलेक्सा हे डिव्हाईस अलेक्स फायर टीव्ही स्टिक, अलेक्सा टीव्ही रिमोट फायर टीव्ही याडिशन, अॅमेझॉन अॅप व अलेक्सा अॅप तसेच मोबाइल फोन, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट टीव्ही हेडफोन्स अशा थर्ड पार्टी डिव्हाइसमध्ये सुद्धा सपोर्ट करते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button