Maharashtra

प्रधानमंत्री खरीप पिकविमा लातूर जिल्हा सहकारी बँक शेतकर्याच्या गावातच भरून घेणार फार्म

प्रधानमंत्री खरीप पिकविमा लातूर जिल्हा सहकारी बँक शेतकर्याच्या गावातच भरून घेणार फार्म

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

सध्या कोरोना विषाणु चे सावट असल्याने शेतकर्याना बँकेत येउन पिक विमा भरण्यासाठी होणारा त्रास वाचावा आणी शेतकरी व बैंक कर्मचारी याना रोगाची लागण होवू नये रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेने यावर्षी खरीप पिक विमा आपल्या गावातच सोसायटी चे चेअरमन व गटसचिव यांच्याकडे अर्जाची छाननी करुन द्यावेत असा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यानी दिली आहे
बँकेच्या संचालक मंडळ यांची बैठ्क बँकेच्या मुख्यालयात माजी मंत्री सहकारी महर्षि तथा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या उपस्तीत चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक माजी मंत्री सहकारी महर्षि दिलिपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कार्यरत असुन शेतकरी सभासदांना यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत सध्या कोरोनाच्या महामारी मुळे ग्रामीन भागात शेतकरी सभासदांना बँकेत येउन विमा भरणे सोशल डिस्टन्स पाळणे कठिण होत आहे या सर्व बाबीचा विचार करून यावर्षीचा पंतप्रधान खरीप पिक विमा 2020 आपल्या गावातच सोसायटी चेअरमन व गटसचिव यांच्याकडे सर्व कागदपत्रे देऊन छाननी करावीत सोसायटी चे चेअरमन व गटसचिव नजिकच्या बँकेच्या शाखेतील अधिकारी कर्मचारी यांच्याकडे नजिकच्या शाखेत एकाच दिवशी विमा स्विकारतील त्यासाठी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाखेच्या मार्फत स्थानिक सोसायटी यांच्याकडे फॉर्म वाटप करनार आहे.
पिक विमा भरण्यासाठी 31जुलाई ही शेवटची तारीख असुन बँकेने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकरी सभासदांना पुन्हा एकदा घरपोच सेवा देण्याचा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी सभासदांत आनंदाचे वातावरण पसरले आहे
बँकेत गर्दी टाळावी ….
यासाठी बँकेत गर्दी टाळावी स्थानिक सोसायटी यांच्याकडे पिक विमा फ़ार्म भरून द्यावा असे आवाहन बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षीं दिलीपराव देशमुख ,चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हाइस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ यानी केले आहे
या बैठकीला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे , व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ,संचालक आमदार बाबासाहेब पाटील,संचालक एस.आर .देशमुख,अँड विश्वंभरराव माने, नाथसींह देशमुख,संभाजी सुळ,अँड प्रमोद जाधव,सुधाकर रुकमे ,भगवानराव पाटील ,व्यंकटराव बिरादार ,धर्मपाल देवशेटे, सन्चालीका सौ स्वयंप्रभा पाटिल,सौ शिवकन्या पिंपळे,यशवंतराव पाटील,संजय बोरा,कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव,उपस्तीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button