Nandurbar

नंदुरबार येथे कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या जेवणावळीचे आयोजन करणाऱ्यांवर व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या शिष्टमंडळाची मागणी.

नंदुरबार येथे कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या जेवणावळीचे आयोजन करणाऱ्यांवर व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या शिष्टमंडळाची मागणी.

फहिम शेख

नंदुरबार-प्रतिनिधी- वृत्तपत्रांनी बातम्या प्रसारित केल्यावरून कळते की, नंदुरबार शहरातील एका बड्या राजकीय नेत्याचा खास विश्वासू आणि पोलीस खात्याचा दलाल असलेल्या एका नगरसेवकाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. कोरोना प्रसार होऊ नये म्हणून शासनाने सामूहिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असताना सुद्धा या नगरसेवकाने मात्र एका बड्या राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर गपचूपपणे चक्क लॉकडाऊन कालावधीत नियमांची पायमल्ली करीत जंगी पार्टी दिल्याचे बोलले जात आहे. परिणामी या प्रकाराने नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या कामगिरीवर पाणी फिरून कोरोनाचा शहरात मोठा विस्फोट होण्याची दाट शक्यता बनली आहे.

तसेच ज्यांनी कायदे नियम पाळायचे तेच अधिकारी अशा गोष्टीत सामील कसे झाले? सामान्य माणसाने तोंडाला रुमाल बांधला नाही तसेच दुकान दोन मिनीट जरी बंद करायला उशिर झाला तर गुन्हा दाखल म्हणून दंड वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उघडपणे लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नगरसेवकावर जागीच कारवाई का केली नाही? असे प्रश्न चर्चेत येऊन आपल्या स्वच्छ कर्तव्यदक्ष कारभारावर दाग ऊमटवला जात आहे. तरी पार्टीचे आयोजन रात्री नऊ नंतर करून संचार बंदीचे उल्लंघन करण्यात आले व उपस्थित अधिकाऱ्यांचे हे वर्तन बेजबाबदारीचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाले किंवा कसे याची व त्या कथित पार्टीला उपस्थित राहिलेल्या सगळयांना कोरोंटाईन करण्याची आवश्यकता असुन नंदुरबार शहर सह जिल्हयात कोरोनाची भयावह स्थितीस प्रोत्साहन देणाऱ्या त्या नगरसेवकाविरुध्द कारवाई करावी हि विनंती याबाबत जिल्हाधिकारी यांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांचे हस्ते निवदेन देण्यात आले. यावेळी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button