Maharashtra

कर्तव्यदक्ष अधिकारी मात्र यांची कारवाई करणे बद्दलची तत्परता झाली

कर्तव्यदक्ष अधिकारी मात्र यांची कारवाई करणे बद्दलची तत्परता झाली बर्फ

त्या अनाधिकृत मिटींगची अखेर प्रांत अधिकारी फैजपूर कडे तक्रार

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सविस्तर वृत्त असे कि शहरात कोरोना ने पाय पसरविले असता लाक डाउन मध्ये अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेच बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाची लपवा लपवी व व्हिडिओ मध्ये कबुली देणाय्रा शाळा कर्मचाय्रा कोण याचा शोध घेणे कामी दि 24/05/2020 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान सरकारने लागू केलेल्या सर्व नियम धाब्यावर ठेऊन गावात गौसिया नगर भागात एका इमारतीच्या दर्शनी भागाच्या ओटयावर या सर्व शिक्षित शाळा कर्मचारी व निवडक संचालकांनी उघड पणे सोशल डिसटनसिंगचा फज्जा उठवून तोंडाला मासक न लावता अनाधिकृत मिटींग घेतली होती.
या बाबत तीन वेळा पुरावे निशी ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी युसूफ शाह यांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या प्रांत अधिकारी फैजपूर , मुख्याधिकारी न.पा.सावदा , ए.पी. आय.सावदा पोलिस स्टेशन , यांना वहाटसप व्दारे पाठवल्या व थेट संपर्क साधला परंतु सदरील प्रकार त्यांना दखल पात्र वाटला नसावा की काय? हे आश्चर्य ची बाब आहे. या उलट थेट कायद्या चे उल्लंघन करणारे , देशातील असंख्य कोरोना योद्धांचा सेवा व त्यागाचे काळी मात्र काळजी न करणारे , स्वतः चे व सार्वजनिक आरोग्यास धोका दायक ठरणारे आपले राष्ट्रीय कर्तव्य विसरणारे या शिक्षित शाळा कर्मचारी व संचालकांवर पंधरा दिवस उलटून ही कठोर कायदेशीर कारवाई संबंधितांनकडून करण्यात आली नसल्याने नाइलाजाने , कायद्यास कोणीही पायदळी उडवून मोकाट फिरता कामा नये याची काळजी घेऊन सदरील अनाधिकृत मिटींग घेणाय्रांवर कायद्या च्या विविध कलमा खाली फौजदारी गुन्हा नोंद व्हावा अशी आशिया ची लेखी तक्रार थेट ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी युसूफ शाह यांनी प्रांत अधिकारी फैजपूर , सह जिल्हा अधिकारी जळगाव , गृहमंत्री म.रा. , यांचे कडे पुढाकार घेऊन करावी लागली , हे वास्तव आहे. देशा सह शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन त्यास प्रतिबंध घालण्या साठी काम करतच आहे. त्यास हातभार लावण्या चा प्रयत्न न करता उलट लाक डाउन काळात नियमांचे जाणिव पुर्वक पणे उल्लंघन करून उघड पणे अनावश्यक मिटींग घेवून कोरोना संसर्ग मध्ये वाढ होईल असे गंभीर कृत्य सदरील शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक व संचालक यांच्या सारखे शिक्षित लोकांकडुन होत असेल तर याला काय म्हणावे? कायद्या चे पालन करणे प्रत्येक व्यकती चे कर्तव्य आहे. कदाचित हे शिक्षकच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असतील. परंतु जर शिक्षकच कायद्या चे उल्लंघन करतील तर त्यांना निर्दोष मानावे का? त्यांच्या कडून असे गैर प्रकारा होत असतील तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील… कोणत्या प्रकार चे मुल्य शिक्षण देत असतील. शिक्षण क्षेत्रात घडणाय्रा अशा गैर प्रकारांनी पुरे पुर सिद्ध होते.
अशा स्थितीत पालकांनी तरी कोणत्या ही अपेक्षा का कराव्या. शिक्षकांकडे शैक्षणिक पदवी सह संवेदनशीलता व शोधक वृत्ती असावी. तो जाणकार , वाचक, चिकित्सक, अभ्यासक, सर्जनशील व परिवर्तनशील माणूस असावा. असे असतांना शिक्षक व संचालक आपले कर्तव्य विसरून थेट सरकार आणि यंत्रणा कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही या मुळे लागण होवुन कोणाचेही जीव जाणार नाही या साठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी लाक डाउन संकट काळात उघड पणे नियमांचे पालन न करता सदरील सर्व शाळा कर्मचारी व संचालक सामुहिक रित्या सरकार आणि यंत्रणेचे कोरोना बाबत प्रयत्न बाबत दुर्लक्ष करून अनाधिकृत मिटींग घेण्या मागचे कारण काय हा तपासा चा व चौकशी चा भाग नाही का?
कोरोना पार्श्वभूमी वर लोकांचे जिव वाचवण्या साठी आपल्या परिवाराला सोडून स्वतः चे जीव धोक्यात टाकुन रात्र दिवस आपले कर्तव्य बजावणारया या कर्तव्यदक्ष अधिकाय्रांस या गंभीर प्रकरण घडवणाय्रा शिक्षक व संचालकांचया गैर कृत्य ची चिड का येत नाही. ही बाब त्यांनी आता पर्यंत सहज पणे न घेता याचे गांभीर्य ओळखून लवकरच दोंषी वर कायद्या च्या विविध कलमा खाली गुन्हा दाखल करतील

” काही दिवसापूर्वी दिल्ली येथे फक्त तोंडाला मासक नसल्याने एका पोलिस अधिकारी वर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ”
” मिटींग मध्ये सोशल डिसटनसिंग व मासक चा अभावामुळे थेट नागपूर चे अधिकारी तुकाराम मुंडे , जळगांव चे आमदार राजु मामा भोळे सह बावीस जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. ”
तसेच नुकतेच मालेगाव येथे एका उर्दू शाळेत 14 शिक्षकांनी अनाधिकृत मिटींग घेतल्याने त्यांचे वर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला. ”

एकी कडे देशाची सुप्रीम कोर्ट व राज्यची उच्च न्यायालय वृत्त प्रत्रात प्रसिद्ध दखल पात्र घटनांची स्वतः हुन गंभीर पणे दखल घेत संबंधितांना नोटीसा बजवतात.
व दुसरी कडे पुराव्यानिशी तीन वेळा सविस्तर बातमी प्रसिद्ध करून ही संबंधित अधिकाय्रांकडुन याची साधी दखल सुध्दा घेतली जात नाही.
महणुन
नाईलाजास्तव अधिकाय्रांकडे लेखी तक्रार करण्याची वेळ आली आहे. सदरील खेद जनक बाब नाही का? या ठोस प्रश्नावर उपाय न झाल्याने उप प्रशन भेडसावत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button