बीड

मानवी हक्क अभियान संघटनेच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्यासोबत बैठक

मानवी हक्क अभियान संघटनेच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्यासोबत बैठक

मानवी हक्क अभियान संघटनेच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्यासोबत बैठक

बीड ( प्रतिनिधी)  दि. १८ – मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिष्टमंडळाद्वारे शिवछत्र बीड येथे भेट घेऊन निवेदन दिले. मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी दिलेल्या निवेदनामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश होता. 
१) मातंग समाजाच्या अ ब क ड वर्गीकरणाचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारच्या सेवेतील सर्व विभागात हे आरक्षण मिळावे यासाठी आवश्यक तो पुढाकार घ्यावा. 
२) मातंग समाजातील राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव लक्षात घेता भविष्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेत देशाच्या सभागृहात, राज्याच्या सभागृहात, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजास योग्य तो वाटा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा. 
३) आमच्या कामाचा संदर्भ घटक मराठवाड्यातील ऊसतोड कामगार असून ऊसतोड कामगारामध्ये मातंग समाजाच्या ऊसतोड कामगारांची संख्या लक्षणीय आहे तेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी ” महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मर्यादित ” या संस्थेत त्यांचा प्रतिनिधी घेण्यात यावा
 ४) भूमिहीनांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी गायरान जमिनी व इतर तत्सम जमिनी कास्तकारांच्या मालकी हक्काच्या करण्यासाठी ठोस कायदा करावा.
           यावेळी मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलींद आवाड यांच्या सोबत कडुदास कांबळे महाराष्ट्र राज्य सचिव , राजेश घोडे बीड जिल्हा अध्यक्ष, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button