Maharashtra

बारामतीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने शेतमाल विक्रीसाठी लढवली शक्कल

बारामतीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने शेतमाल विक्रीसाठी लढवली शक्कल

प्रतिनिधी-आनंद काळे

बारामती-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमूळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाल्याचा दिसून येत आहे.कृषिक्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नाही.बंदमुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.बंदमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाले आहे.बंदमुळेसुद्धा भाजीपाला मार्केटमध्ये आत्ता सहसा गर्दी दिसून येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे इ.पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहे.

बारामती तालुक्यातील शेतकरी हताश न होता सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहे.सोशल मीडियाचा वापर करून शेतकरी आपला माल शेताच्या बांधावर विकताना दिसून येत आहे.त्यामुळे शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना पुढील काळात मजबूत होताना दिसत आहे.

बारामती तालुक्यातील शेतकऱ्याने मार्केटमध्ये आपला माल कवडीमोल भावात विकत असल्याने शेतकरी प्रल्हाद वरे ह्यानी सोशल मीडियाचा वापर करून आपला माल शेतबाधावर विकण्यास सुरुवात केली आहे.वरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतमालाची माहिती सोशल मीडियावर शेयर केली. पिकांची माहिती दिली.वरेनी सहा एकरात विविध प्रजातीचे कलिंगड लागवड केली होती.बारामती परिसरात, मळद ह्या ठिकाणी कलरफुल टरबूज,खरबूज ह्याचे उत्पादन घेतले होते परंतु व्यापारी लोक कवडीमोल भावाने पीक खरेदी करीत होते त्यामुळे प्रल्हाद वरे व त्यांचे सहकारी शेतकरीमित्रांनी नवीन शक्कल लढवून,सोशल मिडीयाचा वापर करून पीक विकण्यास सुरू केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button