Kolhapur

महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील हिरा काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील हिरा काळाच्या पडद्याआड

सुभाष भोसले -कोल्हापूर
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील कृतिशील व्यक्तीमत्व असलेले डी.बी.पाटील (वय 85) यांचे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी चेअरमन, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे कोल्हापूरचे चेअरमन, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे मार्गदर्शक, मुख्याध्यापक संघाचे आधारस्तंभ, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक, ज्ञान तपस्वी असलेले डी.बी. पाटील यांच्या निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
कोल्हापुरातील बहुजन समाजाची शिक्षण संस्था असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते अध्यक्ष होते..त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्था आज उत्तमपद्धतीने काम करत आहेत..कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचेही त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळले..शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टीना त्यांनी कायमच बळ दिले. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो..त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून उद्या बुधवारी अंत्यसंस्कार बाबत निर्णय घेण्यात येणार आहे..तोपर्यंत त्यांचे पार्थिव डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरात ठेवण्यात आले.शिक्षणक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व,हिरा सर्वानी गमाविला आहे.
त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात कोल्हापूरातील सर्व शिक्षकवर्ग सहभागी झाला आहे.ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो…हीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button