प्रतिनिधी —ज्ञानेश्वर जुमनाके
वरोरा। वरोरा व वणी येथे कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय कामगार मध्यप्रदेशातील कामगारांना लाकडाऊन मुळे व राज्याच्या सीमा बंद झाल्यामुले ते अडकले असून त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याचे मार्ग बंद झाले.त्यांना काम नाही खाण्यासाठी अन्न नाही काय करावे काय नाही अशा मनस्थितीत असतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोरा नी 28 मार्चला मदतीचा हात पुढे करून त्यांना भाजी पुरी व थंड पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून त्यांचे मनोबल वाढविले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्धार अध्यक्षा सह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी निर्धार केला आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोराचे अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे व सचिव प्रवीण गंधारे यांनी पदाधिकारी व सदस्यांची एक बैठक बोलावून शहरात असणारे भिकारी,आणि आर्थिक विवंचनेमुळे ज्यांच्या चुली पेटल्या नाही.त्यांना उपासमार होत आहे .तसेच परप्रांतातून आलेल्या कामगारांना भोजनाची व्यवस्था नाही अशांची यादी बनवून त्यांना भाजी पुरी वाटप करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.आणि या उपक्रमात 165 लोकांना भाजी पुरी व थंड पाणी वाटप करण्यात आले.सुरवातीला वरोऱ्यात असणारे छत्तीसगडी 100 कामगार व वरोऱ्यातील महाकाली नगरीत काम करणारे मध्यप्रदेशातील 20 कामगार,त्यानंतर मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील 15 कामगार हे वणी येथे एका ठेकेदारकडे कामावर होते परंतु लाकडाऊनमुळे काम बंद झाले आणि पैसा ही मिळणे बंद झाल्याने उपासमारीचे वाटेवर असतांना सदर कामगार मध्यप्रदेशात जाण्यासाठी वणीवरून 25 की.मी.अंतर पायदळ चालून वरोऱ्याला वणी नाक्यावर पोहचले. ही बाब पत्रकार संघाच्या लक्षात आली ते चालून,चालून थकले होते भुकेले होते.
त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना घाबरू नका अशी हिम्मत देऊन भाजी पुरी वाटप केले. सदर परप्रांतीय कामगार पायदळ मध्यप्रदेश या आपल्या राज्याकडे निघाले आहे असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या लक्षात आणून दिली.आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाची दखल घेत त्यांनी परप्रांतीय कामगारांची 15 एप्रिल पर्यंत त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. पत्रकार संघांनी शहरात फेरफटका मारून रस्त्यावर असणारे भिकारी यांना सुद्धा भाजीपुरी व पिण्यास थंड पाणी दिले.यावेळेस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरोरा शाखा अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे,कार्याध्यक्ष बाळू भोयर,सचिव प्रवीण गंधारे, कोषाध्यक्ष शाहिद अख्तर ,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोहपरे,सदस्य मनीष भुसारी, राजेंद्र मर्दाने ,सादिक थैम,आलेख रठ्ठे आदींची उपस्थिती होती.





