चाळीसगाव – प्रतिनिधी नितीन माळे
कोल्हापूर सांगली येथे नैसर्गिक आपत्ती उदभवुन महापूराने थैमान घातल्याने अनेक कुटुंब बाधीत झाली घरे उद्ध्वस्त होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले अशा पूरग्रस्त बांधवांना मदत व्हावी या हेतूने माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी स्वतः मदत देऊन नागरिकांनी मदत करावी असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी पूरग्रस्तांना स्वखर्चाने एक गोणी हळद व एक गोणी मिरची पावडर अशी मदत देऊन सदर वस्तू राजपूत मंगल कार्यालयात आमदार राजीवदादा देशमुख यांच्याकडे सुपर्द केल्या याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोदबापु पाटील याप्रसंगी रयत सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ( संता पहिलवान) जिल्हा उपाध्यक्ष स्पनिल गायकवाड ,दिनेश चव्हाण ,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे ,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे किशोर शेळके अमोल देठे अदि उपस्थित होते