जातीयवादी हिंसाचाराचे नाहक बळी ठरलेल्या बौद्ध तरुणांवरील आरोपींना फाशीची शिक्षा द्या
प्रतिनिधी/विलास धोंगडे
27 मे रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील नाथपावनी येथे उच्चशिक्षित बौद्ध कार्यकर्ते अरविंद बन्सोड याला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. कारण की अरविंद बन्सोड आणि त्याचे दोन सहकारी बँकेतपैसे काढायला गेले होते रस्त्याने एच पी गॅस एजसी बोर्ड लावलेल्या असल्याने भविष्यात हा फोन क्र. आपल्याला कामात येईल या भावनेने त्याने रस्त्याला लावलेल्या एच पी गॅस बोर्ड चा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता एजन्सी चा मालक नामे मिथिलेश उमरकर व त्याच्या सहकार्याने अरविंद व त्याच्या मित्राला फोटो काढण्यास मज्जाव करून त्याला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून विष पाजून हत्या करणारे समाजकंटक मिथिलेश उमरकर व त्याचे सहकारी ह्यांना तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी.
तसेच पिंपरी चिंचवड पुणे येथील पीपळे सौदागर येथील बौद्ध बांधव विराज विलास जगताप वय (२०)ह्या तरुणाला ७ मे २०२० रोजी ज्या समाज कंटकांनी मारून टाकले त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी काटे परिवारातील मुलीशी आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडविण्यात आले त्यामधील आरोपी कैलास काटे,सागर जगदीश काटे,जगदीश मुरलीधर काटे,हेमंत कैलास काटे,व आणखी दोन अल्पवयीन आरोपी व ह्या प्रकरणातील सर्वच सहआरोपी ह्यांना कठोर शिक्षा व्हावी.कारण ह्या दोन्हीही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला व मानवतेला काळिमा फासणाऱ्या असून ह्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जातीवादी वातावरण निर्माण झाले असून जातीय आकसापोटी निष्पाप युवकांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपींना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून अशे जातीवादी प्रकार पुन्हा देशात कधीच घडतील नाही.अशी मागणी पातूर पोलीस स्टेशन ठाणेदार मा.ठाकूर साहेब व तहसीलदार मा.बाजड साहेब ह्यांना दिनेश गवई शहर महासचिव भारिप बहुजन महासंघ पातूर,आकाश हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,अकोला,सागर इंगळे संस्थापक अध्यक्ष ईगल ग्रुप,अमोल करवते अध्यक्ष प्रहार बहुद्देशीय संस्थाआस्टूल,शुभम धाडसे,सुमेध पोहरे,ह्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली.






